- ऋजुता लुकतुके
फलंदाजी ही एरवी भारतीय संघाची ताकद आहे. पण, यंदा बोर्डर-गावस्कर मालिकेत फलंदाजीनेच भारतीय संघाचा सलग तिसऱ्या कसोटीत घात केला आहे. आणि त्यामुळे मेलबर्न कसोटीत पराभव भारतीय संघाच्या पदरी पडला. चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने आता मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि ही मालिका आता ते गमावणार नाहीत एवढं त्यांनी साध्य केलं आहे. कारण, भारताने सिडनी कसोटी जिंकली तरी मालिकेत २-२ अशी बरोबरी होईल. (Border-Gavaskar Trophy 2024)
यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत हे दोन फलंदाज सोडले तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आणि या दोघांची जमलेली जोडी १२२ धावसंख्येवर फुटल्यानंतर भारतीय संघ फक्त ३३ धावांची भर घालून तंबूत परतला. मालिकेत आघाडी घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला १० वर्षांनंतर बोर्डर-गावस्कर करंडक जिंकण्याची स्वप्न पडू लागली असतील. पण, भारतीय संघाकडेही चषक आपल्याकडेच ठेवण्याची एक शेवटची संधी अजून बाकी आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा – Property Sector : २०२४ वर्षात ४ टक्क्यांनी घटली घर खरेदी)
पण, त्यासाठी उर्वरित सिडनी कसोटी भारताला जिंकावीच लागेल. बोर्डर-गावस्कर चषकाचा नियम असं सांगतो की, मालिकेत बरोबरी झाली तर गतविजेता चषक आपल्याकडे ठेवतो. या आधीच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही असंच घडलं आहे. भारताने चषक राखला कारण, मालिका बरोबरीत सुटली होती. आताही जर सिडनी कसोटी भारताने जिंकली तर मालिकेत पुन्हा एकदा २-२ अशी बरोबरी होईल आणि त्या परिस्थितीत चषक भारताकडेच राहील. (Border-Gavaskar Trophy 2024)
सिडनी कसोटी अनिर्णित राहिली तर मात्र २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलिया या चषकावरही ताबा मिळवेल. यापूर्वी २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाने हा चषक जिंकला होता. त्यानंतर सलग १० वर्षं चषक भारताकडे आहे. मालिकेतील शेवटची सिडनी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. फक्त हा चषकच नाही तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत थोडीफार आशा शिल्लक ठेवायची असेल तरीही भारताला सिडनीत विजय आवश्यक आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community