-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आता संघात परतला आहे. शनिवारचा अध्यक्षीय संघाविरुद्धचा सामना खेळण्यासाठीही तो सज्ज आहे. संघाचं नेतृत्व करताना त्याच्यासमोर आणखी एक प्रश्न आता उभा आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी आणि के एल राहुलने २०१ धावांची सलामी भारतीय संघाला करून दिली. ही जोडी जमलेली असताना यशस्वी बरोबर सलामीला जायचं की, पर्थ प्रमाणे राहुलला जाऊ द्यायचं. एकूण संघ प्रशासनासमोर हा प्रश्न असेल. कारण, रोहितने गेल्या ६ कसोटींमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. अशावेळी ५ किंवा ६ व्या क्रमांकावर तो जास्त प्रभावी ठरेल असाही एक मत प्रवाह तयार होत आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)
शुभमन गिल खेळणार नसेल तर आघाडीला एक जागा शिल्लक राहते. राहुल रोहित आणि यशस्वीच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकावरही येऊ शकतो. पण, राहुलने पर्थमध्ये २७ आणि ७७ धावा केल्यामुळे त्यानेच सलामीला यावं असंही अनेकांचं मत आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात)
रोहित गेल्या काही कसोटींमध्ये अपयशी ठरला त्यापेक्षा जास्त सलत होतं ती त्याची चुकीचे फटके मारण्याची सवय, आडव्या बॅटने खेळताना तो बाद होता होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्टीवर तो मधल्या फळीत आलेला अधिक चांगला, असं काहींचं मत आहे. शिवाय ॲडलेड कसोटी दिवस – रात्र चालणारी म्हणजे गुलाबी चेंडूची कसोटी आहे. या चेंडूवर संध्याकाळच्या बदलत्या वातावरणात फलंदाजी करणं हे काहीसं आव्हानात्मक असू शकतं. अशावेळी भारतीय संघातही काही बदल होऊ शकतात. (Border – Gavaskar Trophy 2024)
पर्थ कसोटीत अश्विन आणि जडेजाच्या ऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. त्याने दुसऱ्या डावांत २ बळीही मिळवले. पण, गुलाबी चेंडूवर फिरकी फारशी प्रभावी ठरत नाही. शिवाय या आधी झालेल्या दिवस – रात्र कसोटीत रवीचंद्रन अश्विनला खेळण्याचा अनुभव आहे. तेव्हा त्याने कसोटींत ५ बळीही मिळवले होते. त्याचा फायदा अश्विनला आताही नक्कीच होईल. तो विचार करूनही अश्विनला खेळवण्याचा विचार गौतम गंभीर करू शकतो. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- Cyber Crime : सेवानिवृत्त जहाज कप्तानची ११ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक)
रोहित संघात आल्यावर कदाचित ध्रुव जुरेलला बाहेर बसावं लागू शकतं. गिल खेळल्यास देवदत्त पाडिक्कललाही बाहेर बसावं लागले. तर वॉशिंग्टन ऐवजी अश्विन संघात येऊ शकतो. या बदलाबरोबरच फलंदाजीच्या क्रमातही बदल होऊ शकतो. (Border – Gavaskar Trophy 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community