-
ऋजुता लुकतुके
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान खेळवली जाणारी ॲशेस मालिका विशेष लोकप्रिय आहे. दोन तुल्यबळ आणि काही दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोन अव्वल संघांदरम्यानची मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातं. या मालिकेचा करिश्मा क्रिकेट जगतावर आहेच. पण, त्याचवेळी अलीकडे स्पर्धात्मकतेच्या बाबतीत बोर्डर – गावसकर चषकाने (Border – Gavaskar Trophy 2025) ॲशेसला मागे टाकलं आहे का, असा प्रश्नही आता विचारण्याची वेळ आली आहे.
याला कारण आहे भारत आणि ऑस्ट्रेलियन संघांनी या मालिकेत गाजवलेली कामगिरी आणि फिरलेले काही निकाल. १९९६ पासून या मालिकेची सुरुवात झाली. तेव्हापासून या दोन चषकांचा तौलनिक अभ्यास करताना काही आकडेवारी समजून घेऊया,
(हेही वाचा – Virat Kohli : जेव्हा विराट कोहली अख्ख्या संघाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला पोहोचतो)
ॲशेस वि. बोर्डर – गावसकर
१९९६ पासून ॲशेसमध्ये एकूण १५ मालिका झाल्या. आणि यातील ८ ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. तर इंग्लिश संघाने ५ मालिका जिंकल्या आहेत. आणि उर्वरित २ बरोबरीत सुटल्या.
तर बोर्डर गावसकर चषकात आतापर्यंत एकूण १६ मालिका झाल्या आहेत. आणि यातील १० जिंकत भारताने वर्चस्व गाजवलं आहे. आणि ऑस्ट्रेलियाने भारताच्या निम्म्या म्हणजे ५ मालिका जिंकल्या आहेत. तर एक अनिर्णित राहिली होती. विशेष म्हणजे भारताने दोनदा ऑस्ट्रेलियात ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे मागची ८ वर्षं या मालिकेत भारतीय संघाने हा चषक राखला आहे. म्हणजेच ॲशेसमध्ये इंग्लंडवर वरचढ ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ भारतापुढे निष्प्रभ ठरला आहे. (Border – Gavaskar Trophy 2025)
(हेही वाचा – Mahayuti Rally in Mumbai : बीकेसीत झालेल्या महायुतीच्या रॅलीत ‘लाल इमली मिल’चे पत्रक भिरकावले; डॉक्टरला अटक)
ॲशेस वि. बोर्डर – गावसकर (एकूण कसोटी विजय)
ॲशेसम (Ashes) मालिकेची सुरुवात १४२ वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून आतापर्यंत ३४५ कसोटी दोन्ही संघ खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने १४२ तर इंग्लंडने ११० जिंकल्या आहेत. तर बोर्डर – गावसकर चषकात ५६ कसोटी झाल्या आहेत. आणि यातील २४ भारताने तर २० ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. भारताने मागच्या १० वर्षांत ही मालिका गमावलेली नाही. या कालावधीत जागतिक क्रिकेटमध्ये एक महासत्ता म्हणून भारतीय संघ समोर आला आहे. (Border – Gavaskar Trophy 2025)
ॲशेस वि. बोर्डर – गावसकर (शेवटच्या ५ मालिका)
बोर्डर गावसकर चषकात भारताने सलग चार शेवटच्या मालिका जिंकल्या आहेत. यातील दोन भारतात आणि दोन ऑस्ट्रेलियात मिळवलेले विजय आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१४ मध्ये शेवटची ही मालिका जिंकली आहे. तेव्हा ही मालिका ऑस्ट्रेलियात झाली होती.
तर इंग्लंडने २०१५ पासून एकदाही ॲशेस मालिका जिंकलेली नाही. त्यानंतरच्या दोन ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. तर इतर दोन अनिर्णत राहिल्या होत्या. त्यामुळे ॲशेसचा चषक २०१५ पासून ऑस्ट्रेलियाकडेच आहे.
(हेही वाचा – BSF ने 600हुन अधिक रोहिंग्या-बांगलादेशींना घुसखोरी करताना त्रिपुरामध्ये पकडले)
ॲशेस वि. बोर्डर – गावसकर (परदेशात विजय)
इथंही भारताने ऑस्ट्रेलियावर बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतासाठी एरवी अत्यंत खडतर दौरा मानला जातो. पण, शेवटच्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने ही मालिका जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने फक्त एकदाच २००४-०५ मध्ये भारतात ही मालिका जिंकली आहे.
दुसरीकडे, २००१ पासून ऑस्ट्रेलियाने एकदाही इंग्लंडमध्ये ॲशेस जिंकलेली नाही. तर इंग्लंडनेही २०१० मध्ये ऑस्ट्रेलियात शेवटची ॲशेस जिंकली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं या मालिकेवर वर्चस्व असलं तरी बहुतेक कसोटी या मायदेशात जिंकलेल्या आहेत.
ॲशेस मालिकेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील या मालिकेचं महत्त्व कमी होणारं नाही. आणि हे महत्त्व ऐतिहासिक आहे. पण, बोर्डर – गावसकर चषकातील स्पर्धात्मक क्रिकेटही चाहत्यांना आवडतंय. आणि खासकरून भारतीय संघाने अलीकडे परदेशात मिळवलेले दोन मालिका विजय या चषकाची लोकप्रियता वाढवणारे ठरले आहेत.
(हेही वाचा – Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला ‘हा’ इशारा; म्हणाले…)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community