- ऋजुता लुकतुके
आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका आणि पुढे ऑस्ट्रेलियातील बहुचर्चित बोर्डर-गावस्कर चषक स्पर्धा यासाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे. यात आफ्रिकन दौऱ्यासाठी मयांक यादवची निवड न होणं आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शामी उपलब्ध नसणं या दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. शमीची अनुपस्थिती हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच भारताला बसलेला एक धक्का असेल. एरवी १८ सदस्यीय या संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह असेल हे आता अधोरेखित झालं आहे. बाकीचे खेळाडूही अपेक्षित असेच आहेत. (Border-Gavaskar Trophy 2025)
उपकर्णधाराला तेज गोलंदाजीच्या बाबतीत मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णन, आकाशदीप सिंग आणि हर्षित राणा यांची साथ असेल. शिवाय ऑस्ट्रेलियन वातावरणात सातव्या, आठव्या क्रमांकावर खेळू शकेल आणि काही षटकं टाकू शकेल असा तेज गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून निशित रेड्डीचीही निवड झाली आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)
कुलदीप यादवला जांघेच्या स्नायूंच्या दुखापतीने सतावलं आहे. त्यामुळे त्याचा विचार होऊ शकला नाही. तर अक्षर पटेलला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरची वर्णी फिरकी गोलंदाज म्हणून संघात लागली आहे. त्याचवेळी फलंदाजीत आघाडीची फळी भक्कम व्हावी आणि रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी खेळणार नसल्यामुळे त्याला बदली खेळाडू मिळावी यासाठी ईश्वरनची निवडही झाली आहे. (Border-Gavaskar Trophy 2025)
(हेही वाचा – Baba Siddiqi Murder प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर! ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र आली भारतात?)
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
भारतीय संघाबरोबर नवदीप सैनी, खलिल अहमद आणि मुकेश कुमार हे तीन राखीव खेळाडूही असतील. आणि हे तिघेही तेज गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघ प्रशासन नवीन तेज गोलंदाज तयार करण्यासाठी किती तयारी करत आहे ते समजून येतं. (Border-Gavaskar Trophy 2025)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, विराट कोहली, सर्फराझ खान, के एल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, आकाशदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितिश रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर
राखीव खेळाडू – खलिल अहमद, मुकेश कुमार व नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यक्ष, आवेश खान व यश दयाल (Border-Gavaskar Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community