Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियाला सापडलं जसप्रीत बुमराहला कसं खेळायचं याचं उत्तर, मायकेल वॉनचा सल्ला काय आहे?

जसप्रीत बुमराहने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आधाडीच्या फळीला नेस्तनाबूत केलं.

64
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियाला सापडलं जसप्रीत बुमराहला कसं खेळायचं याचं उत्तर, मायकेल वॉनचा सल्ला काय आहे?
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियाला सापडलं जसप्रीत बुमराहला कसं खेळायचं याचं उत्तर, मायकेल वॉनचा सल्ला काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नक्कीच जगातील सध्याचा अव्वल तेज गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर तर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला १०४ धावांत बाद करताना बुमराहने ५ बळी घेतले. तर दुसऱ्या डावांत आधीच ५३४ धावांच्या आव्हानाने दडपणाखाली आलेल्या ऑस्ट्रेलियाचे पहिले २ फलंदाज बुमराहने दोनच षटकांमध्ये माघारी पाठवले. तिथेच ऑस्ट्रेलियाचा पराभव स्पष्ट झाला. म्हणूनच बुमराहला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

पर्थ कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने बुमराहच्या गोलंदाजीचा धसका घेतला आहे. बुमराहला (Jasprit Bumrah) कसं खेळायचं याचीच चर्चा तिथल्या मीडियामध्ये सुरू आहे. अशावेळी बुमराहचा प्रश्न ऑस्ट्रेलिया बाहेरही चर्चिला जात आहे. माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने ऑस्ट्रेलियन संघाला एक सल्ला दिला आहे. इंग्लंडलाही त्यांच्या आगामी मालिकेत हा सल्ला उपयोगी पडेल, असं वॉनला वाटतं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – Mushtaq Ali T20 : दुखापतीतून सावरलेले सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईकडून खेळण्यासाठी सिद्ध)

‘बुमराहला (Jasprit Bumrah) खेळायचं असेल तर तुम्हाला आघाडीच्या फळीत तीनपैकी दोन खेळाडू डावखुरे हवेत. आणि बुमराहची लय सुरुवातीलाच बिघडवायची असेल तर तुम्हाला स्वॅप फटका खेळण्यावाचून पर्याय नाही. स्टिव्ह स्मिथ, मॅकक्विनी आणि लबुशेन या उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांसाठी बुमराह घातक ठरला. त्याचे चेंडू झपकन आत वळले की, एकतर फलंदाज पायचीत होतो, नाहीतर त्रिफळाचीत होतो. डावखुऱ्या फलंदाजांसाठी बुमराह तितका घातक ठरणार नाही. त्याला असंच खेळलं गेलं पाहिजे,’ असं वॉन (Michael Vaughan) टेलिग्राफशी बोलताना म्हणाला आहे.

ट्रेव्हिस हेडने (Travis Head) दुसऱ्या डावांत बुमराचा चांगला मुकाबला केला. तेव्हाही तो डावखुरा असणं हे महत्त्वाचं कारण आहे, असं वॉनला वाटतं. त्यामुळे इंग्लिश संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा बेन स्टोक्सने थोडं वर फलंदाजीला यावं, असं वॉनला (Michael Vaughan) वाटतं. इंग्लंडचा संघ भारतात ५ कसोटी, ५ टी-२० सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.