Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ चुकीचा निर्णय भारताच्या पथ्यावर?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. 

64
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : दिवस - रात्र कसोटीत भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : दिवस - रात्र कसोटीत भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?
  • ऋजुता लुकतुके

पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून दमदार कामगिरी करणारा जोश हेझलवूड कमरेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या ॲडलेड कसोटीत खेळू शकणार नाहीए आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ पेचात सापडला आहे. त्याचवेळी हेझलवूडचा बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाने स्कॉट बोलंडची केलेली निवड अनेकांना बुचकाळ्यात पाडत आहे. कारण, बोलंड पंतप्रधानांच्या संघातील प्रमुख गोलंदाज होता आणि भारतीय संघाने कॅनबेरा इथं गुलाबी चेंडूवर त्याला व्यवस्थित खेळून काढलं होतं. त्यामुळे ॲडलेड कसोटी आधी भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियन संघातील हा बदल सकारात्मक मानला जात आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

जोश हेझलवूडला दुखापत होण्यापूर्वीच बोलंडचा समावेश पंतप्रधानांच्या संघात झालेला होता. पण, पहिल्या कसोटीनंतर हेझलवूड दुखापतग्रस्त झाला. तरीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने बोलंडला राखून ठेवलं नाही. उलट कॅनबेरा इथं खेळवलं. हा निर्णय अवसानघातकी असू शकतो, अशी भीती ऑस्ट्रेलियन मीडियानेच आता व्यक्त केली आहे. कारण, ॲडलेडमध्येही बोलंडच ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज असू शकतो. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? Anjali Damania यांची ‘ही’ पोस्ट चर्चेत..)

ॲडलेडमधील ज्येष्ठ क्रीडापत्रकार टॉम हॅरिस यांनी हा मुद्दा सेन रेडिओवर बोलताना उचलला आहे. ‘ऑस्ट्रेलियन निवड समितीने बोलंडला त्या सामन्यात खेळवून काही चूक तर नही ना केली, असं मला वाटून जातं. कारण, दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने गुलाबी चेंडूवरच त्याच्याविरुद्ध सराव केला आहे. हे संघासाठी अवसानघातकी ठरू नये, हीच इच्छा,’ असं मॉरिस म्हणाले. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

स्कॉट बोलंड ऑस्ट्रेलियासाठी १० कसोटी सामने खेळला आहे. पण, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट जमल्यानंतर २०२१ पासून बोलंडची संघात निवड झालेली नाही. आता मात्र ॲडलेड कसोटी खेळण्यासाठी तोच संघाची पहिली पसंती दिसत आहे. संघात सीन अबॉट आणि ब्रँडन डॉगेट यांचा समावेश झाला असला तरी बोलंडचं नाव आघाडीवर आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.