-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेतील (Border Gavaskar Trophy) पहिल्या पर्थ कसोटीत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. शिवाय तोपर्यंत फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीलाही या कसोटीतून सूर गवसला. तशाच काहीशा भावना तेज गोलंदाज मोहम्मद सिराजच्याही (Mohammed Siraj) आहेत. न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर खराब कामगिरीनंतर सिराज विचारात पडला होता. पण, जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याला मदत केल्याचं सिराज सांगतो.
सिराजने (Mohammed Siraj) पर्थ कसोटीत ५ बळी मिळवले. त्यातही दुसऱ्या डावांत मिळवलेले ३ बळी मोलाचे होते. ३० वर्षीय सिराज या कामगिरीविषयी बोलताना म्हणतो, ‘पर्थमध्ये मी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्यामुळे खुश आहे. कारण, मागचे काही महिने मला बळी मिळत नव्हते. आणि मग टोकाचा प्रयत्न करताना माझ्याकडून दिशा आणि टप्पाही भरकटत होता. मला इतकं समजतं की, जेव्हा मी गोलंदाजी करताना खुश असतो, तेव्हा लगेच मला बळी मिळत जातात. तो आनंद हरवला होता. तो पर्थमध्ये मला परत मिळाला.’ (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : शिंदे आजारी, आमदार देवेंद्रद्वारी; सत्ताकेंद्राचा नवा पत्ता ‘सागर बंगला’)
आणि हे बोलत असताना त्याचं श्रेय सिराजने (Mohammed Siraj) बुमराहला (Jasprit Bumrah) दिलं आहे. ‘जस्सीने मला सातत्यपूर्ण गोलंदाजी करायला सांगितली. बळींविषयी विसरून जा. नेटाने गोलंदाजी केलीस तर ते आपोआप मिळतील, असं त्याने मला पर्थ कसोटीपूर्वी सांगितलं होतं. तो माझ्याशी फक्त दिशा आणि टप्पा याच्याचवर बोलायचा. त्यामुळे गोलंदाजीत खूप फरक पडला,’ असं सिराजने सांगितलं.
त्याचबरोबर पर्थमधील उसळत्या खेळपट्टीची दुसरी बाजूही त्याने सांगितली. ‘उसळती खेळपट्टी आणि चेंडूला मिळणारी उंची बघून तुम्ही सुरुवातीला खुश होता. पण, हे विसरता कामा नये की, गोलंदाजाचं काम दिशा आणि टप्पा राखून गोलंदाजी करणं हेच आहे. तेच मी करू शकलो, तेव्हा दुसऱ्या डावात बळी मिळाले,’ असं म्हणत सिराजने (Mohammed Siraj) आपला मुद्दा पूर्ण केला. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
पुढील कसोटीत गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. पण, तो हातात धरल्यावर होणारा स्पर्श सोडला तर हा चेंडू आणि लाल चेंडू यात कुठलाही फरक नसल्याचं सिराज (Mohammed Siraj) सांगतो. त्यामुळे अचूक गोलंदाजीवरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. दुसरी कसोटी येत्या ६ डिसेंबरला ॲडलेड इथं होणार आहे. ही दिवस – रात्र चालणारी कसोटी असेल. भारतीय संघ मालिकेत १-० ने आधाडीवर आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community