Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी कसं आहे हवामान? पावसाचा काय अंदाज?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : कसोटीच्या पहिल्या दिवशी दुपारी पावसाचा अंदाज आहे 

99
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी कसं आहे हवामान? पावसाचा काय अंदाज?
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी कसं आहे हवामान? पावसाचा काय अंदाज?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट जगत आता वाट बघतंय ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याची. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत दोन्ही संघ कुठले अंतिम अकरा खेळाडू खेळवणार याची कल्पना आली आहे. ऑस्ट्रेलियाने आपला अधिकृत संघ जाहीर केला आहे. तर भारतीय कर्णधार रोहीत शर्माने तो मधल्या फळीत खेळणार असल्याची नीट कल्पना दिली आहे. शिवाय युवा वॉशिंग्टन सुंदरचीही त्याने पाठराखण केली आहे. आता दोन्ही संघ कसोटीसाठी सज्ज झालेले असताना खेळपट्टी नेमके कसे रंग दाखवेल आणि पाऊस पहिल्या दिवसाचा खेळ होऊ देईल का, असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा- Fake ED Team : गुजरातमधील गांधीधाममध्ये बोगस ईडी पथकाला अटक, 1 महिलेसह 12 आरोपी ताब्यात)

ॲडलेडचा हवामानाचा अहवाल असं सांगतो की पहिला दिवस तरी पावसाची शक्यता कायम राहील. पहिल्या दिवशी पावसाची शक्यता ४० टक्के आहे. आणि पावसाबरोबर गडगडाटी वाराही असू शकतो. खासकरून दुपारनंतर ही शक्यता वाढते. म्हणजे दुपारी १२ वाजता पावसाची शक्यता ४७ टक्के आहे. तर १ वाजता ही शक्यता ५१ टक्के इतकी वाढते. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

एकदा पहिला दिवस गेल्यानंतर मात्र ॲडलेडचं हवामान खेळासाठी पोषक होईल. आणि शनिवारी तसंच रविवारी इथं पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकेल. पुन्हा पाचव्या दिवशी थोड्याफार सरी कोसळू शकतील, असं ॲक्युचेक वेबसाईटने म्हटलं आहे. अर्थात, इथं झालेला एकही दिवस – रात्र सामना आतापर्यंत चौथ्या दिवसाच्या वर चाललेला नाही. बहुतेक दिवस – रात्र कसोटी या तिसऱ्या दिवशीच निकालात निघाल्या आहेत. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा- Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी)

ॲडलेडच्या खेळपट्टीचे क्युरेटर टेलर हॉग यांनी पहिल्या दिवशी पाऊस गृहित धरला आहे. आणि त्यामुळे खेळपट्टी झाकावी लागली तर ती अशा वातावरणात स्विंगला तसंच तेज गोलंदाजीला जास्त मदत करेल असं त्यांनी सांगितलं. ‘मैदानावर मी ६ मिलीमीटर इतकं गवत ठेवलं आहे. त्यामुळे खेळपट्टी तेज गोलंदाजीलाच मदत करेल. आणि खेळपट्टी जसजशी जुनी होईल, तशी चेंडूचा वेग वाढू शकेल,’ असं हॉग मीडियाशी बोलताना म्हणाले होते. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

२०२० साली भारताचा दुसरा डाव याच मैदानावर ३६ धावांत आटोपला होता. पहिल्या डावात आघाडी मिळालेली असूनही भारतीय संघाने ती कसोटी गमावली होती. दुसऱ्या डावांत गुलाबी चेंडू नेमकी काय कमाल करू शकतो, याचं हे द्योतक आहे. त्यामुळे नाणेफेक, फलंदाजीची वेळ आणि गुलाबी चेंडूला खेळणं हे सगळंच या कसोटीत महत्त्वाचं ठरणार आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.