-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीत भारतीय तेज गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज ट्रेव्हिस हेड यांच्यात शाब्दिक चकमक झडली. शिवाय हेडला बाद केल्यानंतर सिराजने साजरा केलेला आनंद आणि सिराजचा झेल पकडल्यावर हेडला त्याला दिलेलं प्रत्युत्तर हे दोन प्रसंगही गाजले. मैदानावरील पंचांनी त्यांची दखल घेतलीच होती. दोन्ही खेळाडूंबरोबरच रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स या दोन कर्णधारांशीही पंचांनी संवाद साधला. पण, आता आयसीसीही या प्रकरणी लक्ष घालणार आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- Rahul Narvekar पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान !)
ऑस्ट्रेलियन डावाच्या ८२ व्या षटकात सिराजने एका यॉर्कर चेंडूवर हेडला त्रिफळा उडवला. हा महत्त्वाचा बळी मिळवल्यावर सिराजने आनंद साजरा करताना हेडकडे पाहून आक्रमक चेहरा केला.नंतर हेहच्या बाजूने आवाज करणाऱ्या प्रेक्षकांकडेही त्याने रागाने पाहिलं. यावर हेडनेही सिराजकडे पाहून काही शेरेबाजी केली. हेडसाठी ॲडलेड हे घरचं मैदान आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा हेडलाच होता. सिराज कधीही सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी आला की प्रेक्षक त्याची हूर्यो उडवत होते. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
पत्रकार परिषदेत हेडने याविषयी बोलताना, ‘मी सिराजला तू चांगला चेंडू टाकलास असं म्हणालो,’ असं उत्तर दिलं होतं. तर सिराजने हरभजन सिंगशी बोलताना, ‘हेड जे काही सांगतोय ते खोटं आहे. असं काही तो म्हणाला नव्हता. त्याने अपशब्द वापरल्यावरच मी चिडलो,’ असं म्हणाला आहे. पण, आता द डेली टेलिग्राफ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आयसीसीकडून या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमधील पराभवाची ५ कारणं कोणती ?)
दोन्ही खेळाडू आणि कर्णधारांबरोबर सामनाधिकारी चर्चा करून यावर निर्णय घेऊ शकतात. पण, मैदानात अशाप्रकारची भांडणं ही नित्याची मानली जातात. त्यामुळे दंडाखेरीज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community