Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड ओव्हलची खेळपट्टी कशी असेल? क्युरेटर काय म्हणाले?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता आहे. 

31
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड ओव्हलची खेळपट्टी कशी असेल? क्युरेटर काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी साधारण ७ मिमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणाचा या कसोटीवर खूप मोठा परिणाम होईल, असं खुद्द क्युरेटर डॅमियन हॉग यांना वाटतंय आणि त्यामुळे पहिल्या दिवशी कव्हर्स काढता येतील इतकीच मागणी ते करत आहेत. एरवी खेळपट्टी उसळतीच असेल आणि वातावरणातील थंडीमुळे ती आणखी बेभरवशाची होईल असं बोललं जात आहे. प्रेक्षक मात्र पहिल्याच दिवशी कसोटीला गर्दी करणार असं दिसतंय. कारण, ५३,००० तिकिटं विकली गेली आहेत. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

२०२० च्या दौऱ्यात भारतीय संघ याच खेळपट्टीवर ३६ धावांत सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इथं खेळणार आहे. त्यामुळे संघावर आधीच्या कामगिरीचं भूत नक्कीच असणार आहे. सध्या भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पण, मालिकेच्या भवितव्याच्या दृष्टीने ॲडलेड कसोटी निर्णायक असणार असं म्हटलं जातंय. कारण, गुलाबी चेंडूवर संघांची खरी कसोटी लागणार आहे आणि तिथे मिळवलेला विजय संघाला उभारी देणारा ठरेल. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – PV Sindhu Wedding : पी व्ही सिंधूचा भावी नवरा वेंकट दत्ता साई कोण आहे?)

क्युरेटर डॅमियन हॉग हे खेळपट्टीने फलंदाज आणि गोलंदाज अशा दोघांनाही मदत करावी या मताचे आहेत. त्यामुळे खेळपट्टी आव्हानात्मक असली तरी कस दाखवून देणारा खेळाडू इथं चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतो. पण, या कसोटीत हॉग यांना चिंता आहे ती पहिल्या दिवसाच्या खेळाची. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

‘पहिल्या दिवशी वादळ होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी आम्हाला कव्हर्सचा वापर करावा लागणार हे नक्की. अशावेळी खेळपट्टी पुढे कशी वागेल हे सांगता येणं कठीण आहे,’ असं हॉग फॉक्स न्यूजशी बोलताना म्हणाले. सध्या खेळपट्टीवर ६ मिलीमीटरचं गवत ठेवण्यात आलं आहे. नुकत्याच इथं झालेल्या शेफिल्ड शील्ड सामन्यातही असंच गवत ठेवण्यात आलं होतं. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेला सामना अनिर्णित राहिला. तेज गोलंदाजांनी फलंदाजांना सतावलं. पण, फलंदाज ५ दिवस खेळू शकले. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – Ajit Pawar : एकनाथ शिंदे – अजित पवारांमध्ये हास्यविनोद; दादांना सकाळ-संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव…)

२०२० साली भारतीय संघाकडे पहिल्या डावांत ५३ धावांची आघाडी असतानाही दुसऱ्या डावांत संघ ३६ धावांत गडगडला. आणि सामना ३ दिवसांत संपला. पण, त्यावर हॉग यांचं म्हणणं सरळ आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी चांगली झाली म्हणून त्यांनी भारताला ३६ धावांत गुंडाळलं. खेळपट्टीकडून दोघांना साथ होती. आताची खेळपट्टीही तशीच असेल असं त्यांना वाटतं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.