
-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा सलग चौथा कसोटी पराभव ठरला. पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला. पण, तेव्हा रोहित कर्णधार नव्हता. ही कसोटीही तो खेळला नाही. ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ५ बाद १२५ वर खेळत होता. पण, या धावसंख्येत आणखी ४७ धावांची भर घालून १७५ धावांत अख्खा संघ तंबूत परतला. विजयासाठी समोर असलेलं १९ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या षटकातच एकही गडी न गमावता पूर्ण केलं. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर)
ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या पराभवासह कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. सलग चार कसोटी पराभव नावावर असलेल्या दत्ता गायकवाड, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या पंक्तीत आता रोहित जाऊन बसला आहे. सर्वाधिक कसोटी पराभवांच्या बाबतीत मात्र मन्सूर अली खान पतौडी ६ पराभवांसह आघाडीवर आहेत. तर सचिन तेंडुलकरने १९९९ मध्ये ५ कसोटी गमावल्या होत्या. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
ॲडलेड कसोटी सव्वादोन दिवस चालली. ऑस्ट्रेलियातील सगळ्यात कमी काळ चालेलली पण, निकालात निघालेली कसोटी आहे. संपूर्ण कसोटीत फक्त १,०३१ चेंडू टाकले गेले. कसोटीत टाकल्या गेलेल्या चेंडूंच्या निकषावर ही जगातील चौथी सगळ्यात लवकर संपलेली कसोटी ठरली आहे. १९३२ साली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी ६५६ चेंडू चालली होती. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- ‘नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार’; Devendra Fadnavis असं का म्हणाले ?)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वर्षभरातील आपली सगळ्यात नीच्चांकी सरासरी राखली आहे. विराट कोहलीने यावर्षी १६ डावांमध्ये २६.६४ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने २३ डावांत ५९७ धावा करताना २७.१३ ची सरासरी राखली आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
एका वर्षांत सलग कसोटी पराभव
६ – मन्सूर अली खान पतौडी (१९६७-६८)
५ – सचिन तेंडुलकर (१९९९)
४ – दत्ता गायकवाड (१९५९)
४ – महेंद्रसिंग धोनी (२०११)
४ – महेंद्रसिंग धोनी (२०१४)
४ – विराट कोहली (२०२०-२१)
४ – रोहित शर्मा (२०२४)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community