-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटी (Adelaide Test) जवळ येतेय तसा भारतीय संघाची सराव सत्रं आणखी कडक, प्रखर होत चालली आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सत्रात रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला. विशेष म्हणजे रोहित आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) ही जोडी इतर भारतीय खेळाडूंपेक्षा एक तास आधी मैदानावर आली. रोहितने आधी नेट्स गोलंदाजाबरोबर सराव केला. आणि त्यानंतर बुमराहने (Jasprit Bumrah) त्याला साधारण अर्धा तास सलग गोलंदाजी केली. रोहितने बचावात्मक फटके खेळण्यावर भर दिलेला दिसला. तर बुमराह त्याला पूर्ण वेगाने गोलंदाजी करत होता. (Border Gavaskar Trophy)
रोहित नंतर विराट आणि जयस्वालनेही नेट्समध्ये तासभर फलंदाजी केली. सगळे फलंदाज वेगवान गोलंदाजी खेळण्याचा सराव करताना दिसले. ही दिवस – रात्र कसोटी असल्यामुळे भारतीय संघ दुपारी, संध्याकाळी आणि रात्री असा तीन सत्रांमध्ये आलटून पालटून फलंदाजीचा सराव करत आहेत. (Border Gavaskar Trophy)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?)
Rohit Sharma facing Jasprit Bumrah in the nets.
The battle between Two Goats 🥶💥 pic.twitter.com/GFPs6r8cT3
— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) December 4, 2024
(हेही वाचा – Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावर रात्री पुन्हा झाली बैठक)
बुमराहच्या (Jasprit Bumrah) तेज गोलंदाजीने रोहितला (Rohit Sharma) काहीसं सतावलं. गुलाबी चेंडूचा वेग नेहमीच्या लाल चेंडूपेक्षा जास्त असल्याचं निरीक्षण भारतीय फलंदाजांनी नोंदवलं आहे. शिवाय हा चेंडू जास्त स्विंगही होतो. त्यामुळे फलंदाज त्या पद्धतीने सराव करताना दिसत आहेत. ‘गुलाबी चेंडूवर माझी ही पहिलीच कसोटी असेल त्यामुळे मी कोऱ्या पाटीनिशी या सामन्यात उतरणार आहे. पण, हा चेंडू वेगाने बॅटवर येतो. आणि तो वळतोही जास्त,’ असं के एल राहुलने मीडियाशी बोलताना म्हटलं. (Border Gavaskar Trophy)
भारतीय संघाने सरावात क्षेत्ररक्षणाचाही सराव केला. आणि खेळाडूंनी हा चेंडू पटकन दिसत नसल्याची तक्रार केली आहे. ऑस्ट्रेलियातील भारताची ही फक्त दुसरी दिवस – रात्र कसोटी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community