- ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावस्कर मालिकेतील महत्त्वाचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून ॲडलेड इथं सुरू होत आहे. दिवस-रात्र या सामन्याची अनेक कारणांनी चर्चा होत आहे. एकतर भारताने आतापर्यंत परदेशात एकही दिवस-रात्र कसोटी जिंकलेली नाही आणि दुसरं गुलाबी चेंडूवर खेळणं हे वेगळं आव्हान आहे. उलट ऑस्ट्रेलियाचा दिवस-रात्र कसोटीतील यशाचा टक्का ९१ इतका आहे. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे ही एक मोठी संधी आहे. तर भारताला निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी ही कसोटी उपयोगी पडू शकेल. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?)
कर्णधार रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेनंतर या कसोटीसाठी भारतीय संघ कसा असेल याची थोडीफार कल्पना येऊ शकते. रोहित आणि शुभमन संघात परतणार आहेत आणि ते देवदत्त पड्डिकल आणि ध्रुव जुरेल यांची जागा घेतील हे उघड आहे. प्रश्न आहे तो रोहित कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल हा आणि तो मधल्या फळीतच खेळेल, असं सध्या दिसत आहे. कॅनबेरा इथंही रोहितचा क्रमांक विराटच्या खालोखाल पाचवा देण्यात आला होता. शिवाय कॅनबेराच्या सराव सामन्यातही राहुलने सलामीला चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे रोहित पाचव्या किंवा गरजेनुसार, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल असं दिसतंय. तो फलंदाजीचा सराव करतानाही संध्याकाळ नंतरच्या सत्रात करतोय. त्यावरूनही आपल्याला कल्पना येऊ शकते. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन!)
तेज चौकुट तेच कायम राहण्याची शक्यता आहे. तर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरही आपली जागा राखेल असे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आपला अकरा जणांचा संघ जाहीर केला आहे आणि जखमी जोश हेझलवूड ऐवजी त्यांनी स्कॉट बोलंडला संघात स्थान दिलं आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटता सुटेना, पाकच्या अटी भारताला अमान्य)
ॲडलेड कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ – यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, नितिश रेड्डी, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियन संघ – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, स्कॉट बोलंड
हेही पहा –
Join Our WhatsApp Community