- ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीसाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे आणि विराट कोहली बुमराह आणि अश्विनच्या गोलंदाजीवर सराव करताना दिसत आहे. अश्विनही मागचे काही दिवस नेट्समध्ये जोमाने गोलंदाजी करताना दिसत आहे. पण, भारतीय गोटातून मिळत असलेल्या संकेतानुसार, रविचंद्रन अश्विन नाही तर वॉशिंग्टन सुंदरच दुसरी कसोटी खेळणार आहे. ‘वॉशिंग्टन खेळण्याची ९० टक्के शक्यता आहे. जडेजा आणि अश्विन यांच्या पुढे वॉशिंग्टनचाच विचार सध्या होत आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी मीडियाला सांगितलं आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – Sachin – Vinod Reunite : आचरेकर सरांच्या निमित्ताने सचिन आणि विनोद जेव्हा पुन्हा एकाच व्यासपीठावर येतात)
पहिल्या पर्थ कसोटीतही जडेजा आणि अश्विनला वगळण्याच्या भारताच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त झालं होतं. भारताने ही कसोटी २९५ धावांनी जिंकली असली तरी वॉशिंग्टनची कामगिरी पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावांत ४० धावांमध्ये २ बळी अशी होती. तर फलंदाजीत त्याने ४ आणि २९ अशा धावा केल्या. दुसरीकडे, अश्विनने या आधीच्या दौऱ्यात दिवस-रात्र झालेल्या कसोटीत ॲडलेड इथं डावांत ५ बळी घेतले होते. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा – शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण)
त्यामुळे दुसऱ्या कसोटीत आधी अश्विनचा समावेश पक्का समजला जात होता. पण, आता संघ प्रशासनाचा कौल वॉशिंग्टन सुंदरच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. अंतिम निर्णय अजून झालेला नसला तरी आगामी दोन दिवसांतील सरावात हे चित्र आणखी स्पष्ट होऊ शकेल. वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटच्या दोन कसोटींत संघात स्थान देण्यात आलं होतं आणि यात त्याने अनुक्रमे ११ आणि ८ बळी मिळवले होते. तेव्हापासून वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघात कायम आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने सुंदरला ३.२ कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community