Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमधील पराभवाची ५ कारणं कोणती ?

Border - Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून पराभव केला 

136
2 Tier Test Championship ? कसोटी संघ दोन श्रेणींमध्ये विभागले जाणार? भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांची चर्चा सुरू
  • ऋजुता लुकतुके

पर्थमध्ये ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय आणि ॲडलेडमध्ये १० गडी राखून स्वीकारलेला पराभव असा भारतीय संघाचा मागच्या एका महिन्यातील प्रवास आहे. दिवस – रात्र कसोटीत आणि गुलाबी चेंड़ूवर खेळणं भारताला अखेर जमलं नाही. उलट ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये ८ पैकी आठही दिवस – रात्र कसोटी जिंकल्या आहेत. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा- Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराला दुखापत नाही तर फक्त थकवा, मॉर्केल यांनी केलं स्पष्ट)

भारतीय फलंदाजी दोन्ही डावांत ढेपाळली. जेमतेम ८१ षटकं फलंदाज मैदानावर टिकले, ते ही दोन डावांत मिळून. याउलट पर्थमध्ये भारतीय संघाने १९१ षटकं फलंदाजी केली होती. शिवाय बुमरा प्रभावी ठरल्यावर भारताने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियन डाव १०२ धावांत गुंडाळला होता. पण, ॲडलेडमध्ये १४१ चेंडूंत १४० धावा करत ट्रेव्हिस हेडने भारताची झोप उडवली. थोडक्यात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात भारतीय संघ कमी पडला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

 दोन्ही डावांत संध्याकाळचा आव्हानात्मक काळ भारतीय फलंदाजांसाठी अवसानघातकी ठरला. उलट हाच कालावधी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात व्यवस्थित खेळून काढला. शिवाय मिचेल स्टार्कने पहिल्या डावात भारतीय फलंदाजांना जेरीला आणलं. अखेर गुलाबी चेंडूवर भारतीय संघाने सपशेल शरणागती पत्करलेली दिसली. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

अशावेळी भारतीय संघासाठी ॲडलेड कसोटीत कुठल्या गोष्टी संघाच्या विरोधात गेल्या ते बघूया, 

(हेही वाचा- Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील ४० शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, केली ‘ही’ मागणी)

  • दोन कसोटींमधील १० दिवसांची विश्रांती 

पहिली पर्थ कसोटी भारतीय संघाने जिंकल्यावर मध्ये १० दिवसांची विश्रांती होती. हा कालावधी ऑस्ट्रेलियन संघाने संघ पुनर्बांधणीसाठी वापरला. कमिन्सने म्हटल्याप्रमाणे संघाने आपल्या चुकांवर काम केलं. उलट भारतीय संघाने पर्थमध्ये मिळवलेली गती मधल्या दहा दिवसांत गमावली. नाही म्हणायला, कॅनबेरामध्ये दोन दिवसीय सराव सामना भारतीय संघ खेळला. काही नेटस सत्रही झाली. पण, त्याला सामन्याचा सराव म्हणता येणार नाही. पंतप्रधानांबरोबरच्या भेटीतही भारतीय खेळाडूंचा वेळ गेला. सराव सामना तसंच नेट्रसमधील प्रभाव भारतीय खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीत दिसला नाही. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

  • विजयी संघातील ३ बदल 

क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की, जिंकलेला संघ कधी बदलू नये. पण, भारतीय संघात तीन बदल झाले. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन संघात आले. पैकी शुभमन गिलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. पण, रोहित पुन्हा एकदा दोन्ही डावांत अपयशी ठरला. त्याने फक्त ३ आणि ६ धावा केल्या. तर रवीचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठीही खूप उशिरा आणलं. फलंदाजीत त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भारतीय संघात संतुलन दिसलं नाही. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

  • दोन्ही डावांत ढेपाळलेली फलंदाजी 

पर्थ कसोटीत भारतीय फलंदाजांनी १९१ षटकं खेळून काढली होती. तेव्हा फलकावर ६०० धावा लागल्या. या उलट ॲडलेडमध्ये भारताला दोन्ही डावांत मिळून धड ८१ षटकंही खेळून काढता आली नाहीत. तो दोन्ही कसोटींतील फरक ठरला. शुभमन, राहुल, रिषभ यांना चांगली सुरुवात मिळाली. पण, ते मोठी खेळी साकार करू शकले नाहीत. तर स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा दोन्ही डावांत अपयशी ठरले. हे अपयश भारतीय संघाला बॅकफूटवर घेऊन गेलं. पहिल्या डावांत मिचेल स्टार्क आणि दुसऱ्या डावांत पॅट कमिन्सने भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा- ICC Test Championship : ॲडलेडमधील पराभवानंतर भारताची आयसीसी कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण)

  • गोलंदाजीत बुमरावर अती भार 

पर्थमधील विजयात जसप्रीत बुमराने निर्णायक भूमिका वठवली होती. दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियन आघाडीची फळी त्याने स्वस्तात बाद केली होती. तिथेच ऑस्ट्रेलियाने बुमराचा धसकाही घेतला. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूवर भारतीय गोलंदाजांना ते यश मिळालं नाही जे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मिळालं. बुमराने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावांत पुन्हा एकदा आघाडीची फळी गारद केली. पण, ट्रेव्हिस हेडने त्यालाही चकवलं. शिवाय एक तेज गोलंदाज एका बाजूने चांगली गोलंदाजी करत असताना त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळाली नाही. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.