Border Gavaskar Trophy, Adelaide Test : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात काळ्या पडद्यांच्या आत गुप्तपणे सराव का करतोय?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमध्ये सराव करताना भारतीय संघाची ऑसी चाहत्यांनी हूर्यो उडवली.

80
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात काळ्या पडद्यांच्या आत गुप्तपणे सराव का करतोय?
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात काळ्या पडद्यांच्या आत गुप्तपणे सराव का करतोय?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ उर्वरित ऑस्ट्रेलियन दौऱ्यात मैदानाभोवती काळे पडदे लावूनच सराव करणार आहे. संघ प्रशासनाकडून तसे निर्देश गेल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांची ही मागणी स्वीकारली आहे. पर्थमध्येही सुरुवातीला भारतीय संघ मैदानाभोवती काळे पडदे लावूनच सराव करत होता. सराव नेट्समधून मुख्य मैदानावर हलल्यानंतर एखादा दिवस चाहत्यांना सराव पाहण्याची संधी देण्यात आली. पण, ॲडलेडमध्ये भारतीय खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. आणि त्यांनी खेळाडूंवर अनावश्यक शेरेबाजी आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वैतागलेल्या खेळाडूंनी मग आयोजकांकडे वरील विनंती केली आहे. त्यामुळे इथून पुढे भारतीय सराव सत्र हे बंद दाराआडच होणार आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

नेट्सच्या अगदी जवळ चाहते होते. आणि ते वारंवार खेळाडूंना चौकार, षटकार ठोकण्याची मागणी करत होते. तसं केलं नाही तर शेरेबाजीही होत होती, असं समजतंय. खेळाडूंच्या इतकं जवळ प्रेक्षकांनी असणं तसंही धोक्याचंच होतं. त्यामुळे मग भारतीय संघ प्रशासनाने चाहत्यांना बाहेर काढण्याची विनंती केली.

(हेही वाचा – Priyanka Vadra यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट; केली ‘ही’ मागणी)

‘प्रेक्षक अक्षरश: नेट्सला लागून बसले होते. आणि खेळाडू सराव करत असताना प्रेक्षक सतत सेल्फी आणि ऑटोग्राफची मागणी करत होते. फलंदाजीचा सराव सुरू असेल तर षटकार, चौकारांची मागणी होत होती. चौका मार, छक्का मार, आऊट हो गया, असा गजर ऐकू येत होता. यातून सुरक्षाविषयक आणीबाणीही निर्माण होऊ शकली असती,’ असं एका प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने सांगितलं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

भारतीय संघ सध्या दुसऱ्या ॲडलेड कसोटीची (Adelaide Test) तयारी करत आहे. शुक्रवारी ६ तारखेला ही दिवस – रात्र कसोटी सुरू होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघाने संध्याकाळच्या सत्रात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा जोरदार सराव केला आहे. आणखी एका सत्राचा सराव गुरुवारी पार पडेल. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.