-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीत भारतीय फलंदाजी दोन्ही डावांत सपशेल ढेपाळली. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३३७ धावा त्यांना पुरे पडल्या. फलंदाजांच्या अपयशाबरोबरच भारतासाठी उठून दिसलं ते गोलंदाजीतील अपयश. कारण, पर्थ कसोटीत एकट्या बुमराने ८ बळी मिळवत दोनदा ऑस्ट्रेलियन आघाडीची फळी कापून काढली होती. तेच ॲडलेडमध्ये पहिल्या डावांत बुमराने आपली कामगरी चोख पार पाडली. पण, दुसऱ्या बाजूने सुरुवातीला त्याला हवी तशी मदत मिळाली नाही. त्यामुळे कसोटीतील पराभवानंतर गोलंदाजीचा सगळा भार एकटा जसप्रीत बुमरा वाहू शकणार नाही, ही गोष्ट उघड झाली. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
कर्णधार रोहित शर्मानेही तेच पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. ‘आम्ही कसोटीत फक्त एका गोलंदाजासह उतरलो नव्हतो. संघात इतर ४ गोलंदाजही होते. त्यांनीही बुमराबरोबर जबाबदारी वाटून घ्यायला हवी होती. पण, ते झालं नाही. बुमरा दोन्ही बाजूंनी एकाचवेळी षटकं टाकू शकत नाही. त्याला दुसऱ्या बाजूने मदत मिळायला हवी होती, जी मिळाली नाही,’ असं रोहीतने म्हटलं. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीने अखेर जनतेचा कौल केला मान्य!)
हर्षित राणाचीही रोहितने पाठराखण केली. पण, त्याचबरोबर गोलंदाजीतील उणीवही अधोरेखित केली. त्यामुळे मग स्वाभाविक प्रश्न होता तो, मोहम्मद शामी ऑस्ट्रेलियात कधी येणार? त्यावर मात्र रोहितचं उत्तर काहीसं सावध होतं. ‘शामीसाठी संघाचे दरवाजे उघडेच आहेत. पण, त्याला नेमकं कधी संघात घ्यायचं याचा निर्णय बीसीसीआयचं वैद्यकीय पथकच घेऊ शकतं,’ असं रोहित म्हणाला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
Rohit Sharma updates Mohammed Shami’s fitness and his chances of playing in the latter stages of the series #AUSvIND pic.twitter.com/wNfi2e9Ho7
— 7Cricket (@7Cricket) December 8, 2024
या दौऱ्यात भारतीय संघ बुमरावर अवलंबून आहे. पर्थ कसोटीत भारतीय संघ १५० धावांत बाद झाल्यावर बुमराने ऑस्ट्रेलियाचे ५ बळी झटपट मिळवल्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियन डाव १०४ धावांत गुंडाळता आला. त्यानंतरही दुसऱ्या डावांत बुमराने आघाडीचे २ फलंदाज झटपट माघारी पाठवले होते. त्यामुळे भारतीय संघ २९५ धावांनी ही कसोटी जिंकला त्यात बुमराचा वाटा मोठा होता. ही मालिका ५ कसोटींची आहे. अशावेळी एकट्या बुमरावर सगळा ताण पडून चालणार नाही, हा मुद्दा आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
Rohit Sharma on Indian bowling attack 🗣️#RohitSharma pic.twitter.com/zEc8p0aEpa
— Rohit Sharma (@ROHITSH8795922) December 8, 2024
‘शामी खेळण्यासाठी १०० टक्के तंदुरुस्त नसताना त्याला आणण्याची घाई करायची नाही, म्हणून ऑस्ट्रेलियात आम्ही आतापर्यंत त्याला आणलं नाही. तो वर्षभर खेळला नाहीए. अशातच अचानक त्याच्यावर गोलंदाजीचा भार टाकायचा हे योग्य नाही. पण, संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले आहेत. तो कधीही संघात येऊ शकतो. तो निर्णय मात्र बीसीसीआयने घ्यायचा आहे,’ असं रोहित शामीविषयी बोलताना म्हणाला. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा)
बोर्डर – गावसकर मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community