-
ऋजुता लुकतुके
आगामी बॉर्डर – गावसकर करंडकातील (Border – Gavaskar Trophy) यशासाठी भारतीय संघ विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराच्या (Jasprit Bumrah) कामगिरीवर अवलंबून असेल असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉला वाटतं. २०२४-२५ मधील स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असून यात ५ कसोटी सामने होणार आहेत. पहिली कसोटी २२ नोव्हेंबरला पर्थ इथं होणार आहे. आणि त्यानंतरचे सामने ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी इथं होणार आहेत. यातील ॲडलेडचा सामना हा दिवस रात्र असेल.
(हेही वाचा- Cabin Crew Salary : विमानातील हवाई सुंदरी, सेवक, पर्सर यांना किती पगार असतो?)
‘दोन तगडे संघ असल्यामुळे ही मालिका खूप रंगतदार होईल. यात भारताला विजयाची अधिक संधी आहे. कारण, भारताकडे बुमरा, सिराज आणि शामी यांच्या रुपात चांगलं तेज आक्रमण आहे. कुलदीप, अश्विन आणि जाडेजासारखे गोलंदाजही आहेत. पण, खरी मदार असेल ती विराट कोहली आणि बुमरा यांच्यावरच. दोघं कशी कामगिरी करतात यावर संघाचं यश अवलंबून असेल,’ असं वॉने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Border – Gavaskar Trophy)
या दोन खेळाडूंसाठी त्याने परदेशातील कामगिरीचा विचार केला आहे. ‘विराटला गेली कित्येक वर्षं आपण परदेशी खेळपट्ट्यांवर पाहिलं आहे. तिथेही तो आव्हानांना पुरून उरतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील वातावरणात कोहलीच भारताचं मुख्य अस्त्र असेल. पण, ऑस्ट्रेलियाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे ही लढतही चुरशीची होईल,’ असं स्टिव्ह वॉला वाटतं. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- Maharashtra च्या राजकारणात महिला मुख्यमंत्री होण्याची मागणी या निवडणुकीत होणार पूर्ण?)
मागच्या चार बॉर्डर – गावसकर करंडकांवर भारतीय संघाचंच वर्चस्व राहिलं आहे. २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जिंकला आहे. हा चषक सुरू झाल्यापासून १० वेळा भारताने तो जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने तो पाचदा जिंकला आहे. २०१३-१४ मध्ये ऑस्ट्रेलियाने तो शेवटचा जिंकला आहे. भारतील मालिका विजय २००४-०५ मध्ये मिळवला आहे. (Border – Gavaskar Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community