-
ऋजुता लुकतुके
‘मला माहीत नाही. हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा,’ असं म्हणत सुनील गावसकर समालोचन कक्षात निघून गेले. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर बोर्डर – गावसकर चषकाच्या बक्षिस समारंभात तुम्ही का नव्हता, असा प्रश्न त्यांना पत्रकारांना विचारला होता. चषकाचं नाव दोन्ही देशांतील दोन समकालीन दिग्गज खेळाडूंवरून देण्यात आलं आहे. दोन्ही खेळाडू मालिकेच्या सर्व सामन्यांसाठी हजर होते. आणि अंतिम कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाने हा चषक जिंकल्यावर त्यांना तो प्रदान करायला व्यासपीठावर फक्त ॲलन बोर्डर होते. सुनील गावसकर नव्हतेच. आणि त्यावरून भारतीय मीडियामध्ये वाद निर्माण झाला आहे. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- HMPV Virus ची भारतात एन्ट्री; तिसरा रुग्ण आढळला)
सुनील गावसकर मैदानापासून काही मीटर दूर समालोचन कक्षातील आपले सहकारी जतीन सप्रू आणि इरफान पठाण यांच्याबरोबर होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यावर एक पत्रक तर जारी केलं. पण, त्यात स्पष्टीकरण दिलेलं नाही. ‘दोघंही व्यासपीठावर एकत्र असते तर बरं झालं असतं,’ इतकंच या पत्रकात म्हटलं आहे. (Border – Gavaskar Trophy)
ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका ३-१ ने जिंकली. आणि बोर्डर – गावसकर चषकावर १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाने कब्जा केला आहे. या अख्ख्या मालिकेत सुनील गावसकर समालोचक म्हणून विविध वाहिन्यांसाठी जबाबदारी निभावत होते. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही गावसकर संध्याकाळी पाच वाजेपर्यत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच होते. त्यांनी सामन्यानंतरचे टीव्ही कार्यक्रम पूर्ण केले. आणि संध्याकाळी सहानंतर त्यांनी कपडे बदलून ते ठिकाण सोडलं. ते उपलब्ध असताना त्यांना बक्षिस समारंभासाठी बोलवण्यात आलं नाही ते उघड आहे. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- Gautam Gambhir Report Card : गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारवर)
पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून तरी यावर वेगळं स्पष्टीकरण दिलेलं नाही. भारतीयांमध्ये मात्र गावसकरांना डावलल्याची भावना आहे. (Border – Gavaskar Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community