-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं होणार आहे. पण, भारतीय संघ अजूनही ॲडलेडमध्येच आहे. बुधवारी संध्याकाळी संघ ब्रिस्बेनला पोहोचेल. कारण, पर्थ कसोटी एरवी मंगळवारपर्यंत चालणार होती. पण, ती दोन दिवस आधीच संपली. त्यानंतर भारतीय संघाने तातडीने ब्रिस्बेनला जाण्याऐवजी तिथेच सराव करण्याचा पर्याय निवडला आहे. मागचे दोन दिवस भारतीय संघ ॲडलेड ओव्हलवरच सराव करत आहे. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Ronaldo Net Worth : ख्रिस्तियानो रोनाल्डोची एकूण मालमत्ता, त्यातं घर, आलिशान गाड्या यांच्याविषयीच्या रंजक गोष्टी )
सरावात मुख्य भर आहे तो फलंदाजीवर. सकाळच्या सत्रात विराट कोहली, यशस्वी जयसवाल यांनी फलंदाजीचा कसून सराव केला. आधीच्या दोन कसोटींचा अंदाज घेतला तर जयसवाल, विराट कोहली आणि नितिश रेड्डी वगळता इतर एकाही फलंदाजाला इथल्या खेळपट्टीवर उभं राहून धावा करणं जमलं नाहीए. उसळत्या खेळपट्टीवर खेळताना तांत्रिक चुका खेळाडूंना भोवल्या आहेत. त्यामुळे चुका सुधारण्यावरच खेळाडूंचा भर दिसतो आहे. बीसीसीआयने खेळाडूंचा ॲडलेडमधील सरावाचा व्हीडिओ ट्विट केला आहे. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
It is time to look ahead.
Preparations for the Brisbane Test starts right here in Adelaide.#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/VfWphBK6pe
— BCCI (@BCCI) December 10, 2024
भारतीय संघासमोर आता दोन समस्या आहेत. रोहित शर्मा नेमका कुठल्या क्रमांकावर खेळणार याची चाचपणी पुन्हा एकदा भारतीय संघाला करायची आहे. तर मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराला पर्थमध्ये झालेली दुखापत किरकोळ असल्याचं प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी सांगितलं असलं तरी तो कसोटीनंतरच्या सराव सत्रांना उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याच्यावर गोलंदाजीचा अतिरिक्त भार पडणार नाही, याची काळजीही संघाला घ्यावी लागेल. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Jalna Truck Firing: जालन्यात टोलनाका परिसरात ट्रक चालकावर गोळीबार; नेमकं प्रकरण काय?)
दरम्यान विराट कोहलीने ॲडलेड कसोटी तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच संपल्यावर लगेचच फलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली होती. नंतरही नेट्समध्ये तो उसळत्या चेंडूवर सराव करताना दिसला. पर्थमध्ये शतक झळकावणारा विराट ॲडलेडमध्ये मात्र ७ आणि ११ धावांवरच बाद झाला होता. ब्रिस्बेनच्या गब्बा खेळपट्टीवर चेंडू उसळीही घेतात. आणि वेगाने येतात. त्यामुळे बॅकफूटवर खेळण्याचा सराव विराट करताना दिसला. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community