-
ऋजुता लुकतुके
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने २०१० च्या दशकात भारतीय कसोटी संघाला मधल्या फळीत स्थैर्य मिळवून दिलं. त्यातही चेतेश्वर पुजाराचा संयम हा क्रिकेटमध्ये एक उदाहरण ठरावं इतक्या उच्च क्षमतेचा आहे. पण, संशयी फलंदाजीच्या जोरावर चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०१८ तसंच २०२० च्या मालिकांमध्ये विराट कोहलीच्या बरोबरीने भारताच्या मालिका विजयांमध्ये निर्णायक भूमिकाही बजावली आहे. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Congress Legislature Group Leader : काँग्रेसला मिळत नाही विधिमंडळ गटनेता ?)
ऑस्ट्रेलियात खेळण्याचा चांगला अनुभव असलेल्या पुजाराने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना भारतीय अंतिम अकरा जणांच्या संघात काही बदल सुचवले आहेत. त्याच्यामते हर्षित राणाला आणखी एक संधी मिळायला हवी. पण, फिरकीपटू म्हणून वॉशिंग्टन सुंदर संघात परतायला हवा. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
‘ब्रिस्बेन कसोटीत एकच बदल संघात संभवतो. वॉशिंग्टन सुंदर अश्विनच्या जागी संघात असायला हवा. गोलंदाज म्हणून त्याच्या उपयोगापेक्षा फलंदाज म्हणून असलेला उपयोग मोठा आहे. ॲडलेडमधील फलंदाजी पाहता सुंदरच संघात असायला हवा. हर्षित राणाला वगळायचं का? मला वाटतं त्याला आणखी एक तरी संधी मिळायला हवी,’ असं पुजारा म्हणतो. राणाला ॲडलेड कसोटीत बराच मार बसला. त्याला बळीही घेता आला नाही. शिवाय फलंदाजीतही त्याने भोपळा फोडला नाही. पण, एकाच कसोटीनंतर खेळाडूला बाद करणं पुजाराला पटत नाही. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : जसप्रीत बुमराह खरंच तंदुरुस्त आहे का ?)
मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. ब्रिस्बेन कसोटी जिंकून मालिकेत पुन्हा आधाडी घेण्याचं आव्हान भारतासमोर आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवरही होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित तीनही कसोटी जिंकणं आवश्यक आहे. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community