Border – Gavaskar Trophy : गौतम गंभीर ‘वैयक्तिक कारणां’वरून मायदेशात परतले

Border - Gavaskar Trophy : पर्थ कसोटी संपल्यानंतर लगेचच गंभीर यांनी नवी दिल्लीसाठी विमान पकडलं.

42
Border - Gavaskar Trophy : गौतम गंभीर ‘वैयक्तिक कारणां’वरून मायदेशात परतले
Border - Gavaskar Trophy : गौतम गंभीर ‘वैयक्तिक कारणां’वरून मायदेशात परतले
  • ऋजुता लुकतुके

पर्थ कसोटीत भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) हे अचानक मायदेशात परतले आहेत. ‘वैयक्तिक कारणा’मुळे ते नवी दिल्लीला परतल्याचं समजतंय. आणि पुन्हा कधी ऑस्ट्रेलियाला जाणार हे सध्या निश्चित नाही. पर्थ कसोटीनंतर भारतीय संघाला १० दिवस विश्रांती मिळणार आहे. पण, या कालावधीत कुणीही सुटी घेणार नव्हतं किंवा भारतातही परतणार नव्हतं. पण, तशाच काही महत्त्वाच्या कारणामुळे गंभीर यांना नवी दिल्लीला घरी परतण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयशी (BCCI) संपर्क करून गंभीर यांनी आपली समस्या सांगितली आहे.

मंगळवारी पहाटे इंडियन् एक्स्प्रेसने सगळ्यात आधी ही बातमी दिली. ‘गौतम गंभीरने (Gautam Gambhir) बीसीसीआयला (BCCI) संपर्क केला. आणि काही वैयक्तिक महत्त्वाच्या कारणामुळे भारतात परतावं लागत असल्याचं सांगून परवानगी मागितली. बीसीसीआयने कारण समजून घेत त्वरित ही परवानगी दिली. दुसऱ्या कसोटीआधी ॲडलेडमध्ये गंभीर भारतीय संघात पुन्हा शामील होईल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आहे. (Border – Gavaskar Trophy)

(हेही वाचा – JW Marriott Mumbai Juhu : जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल मुंबई विमानतळापासून किती दूर आहे?)

भारतीय संघाकडे ॲडलेड कसोटीच्या तयारीसाठी १० दिवस आहेत. पण, संघ थेट ॲडलेडला न जाता बुधवारी पहाटे पर्थहून कॅनबेराला जाणार आहे. तिथे ऑस्ट्रेलियन अध्यक्षीय संघाविरुद्ध एक दोन दिवसीय सामना शनिवार आणि रविवारी रंगणार आहे. या सामन्यानंतर रविवारी भारतीय संघ ॲडलेडला रवाना होईल. भारतासाठी या दौऱ्यात हा एकमेव सराव सामना आयोजित करण्यात आला आहे. आणि इथेही या सामन्याला प्रथमश्रेणी सामन्याचाही दर्जा नाहीए. (Border – Gavaskar Trophy)

ॲडलेडची दुसरी कसोटी ४ डिसेंबरला सुरू होत आहे. ही कसोटी दिवस – रात्र असल्यामुळे गुलाबी चेंडूचा वापर आणि रात्रीच्या वेळी बदलणारं वातावरण याच्याशी जुळवून घेणं हे आव्हान खेळाडूंसमोर असणार आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पर्थमध्येच भारतीय संघात शामील झाला आहे. आणि पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबर (Gautam Gambhir) ड्रेसिंग रुममध्ये बसलेला दिसला. खेळ संपल्यानंतर आणि खानपाना दरम्यान रोहितने गुलाबी चेंडूने सरावही केला. (Border – Gavaskar Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.