-
ऋजुता लुकतुके
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) नवी दिल्लीतून ऑस्ट्रेलियासाठी निघाले असून मंगळवारी ०३ डिसेंबर रोजी ते ॲडलेडला पोहोचतील. शुक्रवारपासून तिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची दुसरी कसोटी सुरू होणार आहे. त्यापूर्वी गंभीर संघाबरोबर असतील, असं क्रिकइन्फो वेबसाईटने म्हटलं आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) काही वैयक्तिक कारणांमुळे पर्थ कसोटीनंतर मायदेशी परतले होते. कॅनबेरा इथं झालेल्या दिवस – रात्र सराव सामन्यासाठी गंभीर संघाबरोबर नव्हते. (Border Gavaskar Trophy)
गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) अनुपस्थितीत, अभिषेक नायर, रायन टेन ड्युसकाटे आणि मॉर्नी मॉर्केल यांनी संघाला मार्गदर्शन केलं. पंतप्रधानांच्या संघाचा भारताने ६ गडी राखून पराभव केला. सामन्यात शुभमन गिलने अर्धशतक ठोकलं. तर हर्षित राणाने ४४ धावांत ४ बळी मिळवले. भारतीय संघ सोमवारी कॅनबेराहून ॲडलेडला पोहोचला आहे. इथे कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ३ सराव सत्र आयोजित करण्यात आली आहेत. यातील दोन ही संध्याकाळच्या वेळी आहेत. तर एक दुपारी असेल. (Border Gavaskar Trophy)
(हेही वाचा – MPSC Exam मधील प्रश्न चर्चेत; मित्र दारू पिण्याचा आग्रह करता करतील, तेव्हा काय कराल ?)
ॲडलेड कसोटी दिवस – रात्र असल्यामुळे ही कसोटी पर्थपेक्षा कितीतरी बाबतीत वेगळी असणार आहे. इथं गुलाबी चेंडूचा वापर होईल. आणि संध्याकाळच्या वेळी इथं गोलंदाजी आणि फलंदाजीही आव्हानात्मक असते. त्यादृष्टीने भारतीय संघात काही बदल करावे लागतील. शिवाय पर्थमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) दोघेही खेळले नव्हते. ते आता संघात परतले आहेत. अशावेळी अंतिम अकरा खेळाडूंची निवड नेमकी कशी करायची, रोहित शर्मा (Rohit Sharma) मधल्या फळीत खेळणार की, सलामीला, संघातून कोणते दोन खेळाडू बाहेर जाणार अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर गंभीरला उत्तरं शोधायची आहेत. (Border Gavaskar Trophy)
भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर असला तरी ॲडलेड कसोटी वेगळी आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे भारताला ही मालिका गमावून चालणार नाही. देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्या जागी रोहित आणि शुभमन संघात येतील अशी शक्यता आहे. पण, गुलाबी चेंडू पाहता रविचंद्रन अश्विनचाही संघात समावेश होऊ शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community