-
ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावसकर मालिकेतील शेवटच्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. मालिकाही त्यामुळे भारताने १-३ ने गमावली. आणि १० वर्षांनंतर बोर्डर – गावसकर चषकावरील संघाचा ताबाही गेला. इतकंच नाही तर आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतूनही भारतीय संघ बाहेर पडला. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या पदरी पराभवच आले आहेत. (Border – Gavaskar Trophy)
(हेही वाचा- भारतद्वेष्टे George Soros यांना मिळणार अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान)
आधी, त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर ०-३ असा पराभव पत्करावा लागला. आता बोर्डर गावसकर करंडकातही पराभव झाला आहे. इतकंच नाही तर भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दलही बोललं जात आहे. संघात दोन तट पडल्याची चर्चा आहे. आणि काही खेळाडूंना गंभीरचं ड्रेसिंग रुममधील वागणं आवडत नाहीए. (Border – Gavaskar Trophy)
सिडनी कसोटी भारताने फक्त तीन दिवसांत गमावली. त्यानंतर बोलताना गंभीर यांनीच एक सूचक विधान केलं होतं. ‘भारतीय संघ स्थित्यंतराच्या कालावधीत आहे हे खरं असलं, तरी नेमके आपण कुठे आहोत हे सांगणं कठीण आहे. आणि पाच महिन्यांनी काय परिस्थिती असेल ते सांगणंही कठीण आहे. इथं ५ महिन्यानंतरचा विषय निघाला कारण, भारताला पुढील मालिका इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. (Border – Gavaskar Trophy)
Ready to defend their World Test Championship mace 👊
Australia qualify for the #WTC25 Final at Lord’s 🏏
More 👉 https://t.co/EanY9jFouE pic.twitter.com/xcpTrBOsB8
— ICC (@ICC) January 5, 2025
भारतीय संघ जून महिन्यात पाच कसोटींच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. ही मालिका नवीन कसोटी अजिंक्यपद हंगामाची सुरुवात असेल. अशा स्थितीत लक्ष्मणकडे कसोटी संघाचे प्रशिक्षकपद सोपवले जाणार असल्याचं आता बीसीसीआयमध्येच बोललं जात आहे. निदान त्याने हंगामी म्हणजे तात्पुरतं नेतृत्व करावं अशी काहींची इच्छा आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत, ते अनेकदा संघासोबत छोट्या मालिकांमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून जातात, परंतु लवकरच त्यांना मोठी भूमिका मिळू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Border – Gavaskar Trophy)
टाइम्स नाउच्या एका बातमीत पीटीआयच्या हवाल्याने म्हटले आहे की, राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयची पहिली पसंती होती. बीसीसीआयनेही मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी अनेक परदेशी दिग्गजांशी संपर्क साधला होता, परंतु तीनही प्रकारांसाठी वेळ देण्यास असमर्थता दाखवल्यामुळे त्यांचा विचार झाला नाही. (Border – Gavaskar Trophy)
चॅम्पियन्स करंडकानंतर भारतीय संघाच्या पुढील वाटचालीवर बीसीसीआयमध्ये विचार अपेक्षित आहे. आणि तेव्हा हा महत्त्त्वाचा बदल होऊ शकतो. (Border – Gavaskar Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community