Border – Gavaskar Trophy : १० वर्षांनंतर भारताने गमावली बोर्डर – गावसकर मालिका, भारतीय संघाचं प्रशस्तीपत्रक लाल

Border - Gavaskar Trophy : जसप्रीत बुमराला ९० टक्के, बाकीच्या खेळाडूंना लाल शेरे

56
Border - Gavaskar Trophy : १० वर्षांनंतर भारताने गमावली बोर्डर - गावसकर मालिका, भारतीय संघाचं प्रशस्तीपत्रक लाल
Border - Gavaskar Trophy : १० वर्षांनंतर भारताने गमावली बोर्डर - गावसकर मालिका, भारतीय संघाचं प्रशस्तीपत्रक लाल
  • ऋजुता लुकतुके

सिडनीतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिभारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिकाही ३-१ ने जिंकली. त्याचबरोबर बोर्डर – गावसकर चषकावरही त्यांनी १० वर्षांनंतर ताबा मिळवला. मालिकेतील पराभवाबरोबरच भारतीय संघ आता कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे. आणि ऑस्ट्रेलियन संघ आपलं विजेतेपद टिकवण्यासाठी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी झुंजणार आहेत. (Border – Gavaskar Trophy)

(हेही वाचा- नववर्षात आणखी दोन Metro मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता; काय आहे सद्यस्थिती ?)

भारतीय संघासाठी या मालिकेत पर्थमधील विजयाने सुरुवात तर दणक्यात झाली. पण, युवा यशस्वी जयसवाल सोडला तर कामगिरीत सातत्य कुणीच राखू शकलं नाही. आणि फलंदाजांच्या फळीने तर घोर निराशा केली. दुसरीकडे, गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने मालिकेत ३२ बळी मिळवून मालिकावीराचा किताबही जिंकला. पण, तो सिडनी कसोटीत गोलंदाजी करणार नाही म्हटल्यावर भारतीय आव्हानच किती फिकं पडलं ते चौथ्या डावांत दिसलं. विजयासाठी १६२ धावा ऑस्ट्रेलियाने अगदी आरामात पूर्ण केल्या. (Border – Gavaskar Trophy)

फलंदाजी आणि गोलंदाजीतील या अपयशामुळे अधून मधून थोडी चमक दिसण्याखेरिज भारतासाठी काहीच चांगलं घडलं नाही. विराट, रोहित या ज्येष्ठ खेळाडूंच्या अपयशाची, सिराज-आकाशदीप यांच्या निष्प्रभ गोलंदाजीची चर्चा आता होत राहील. तर गौतम गंभीरलाही पराभवासाठी जबाबदार धरलं जाईल. एकटा जसप्रीत बुमराह विरुद्ध अख्खा ऑस्ट्रेलियन संघ अशी ही लढत होती. आणि त्यात भारतीय संघाचं प्रशस्तीपत्र बघूया, (Border – Gavaskar Trophy)

(हेही वाचा- Eknath Shinde यांना धमकी देणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु)

फलंदाजांचं प्रशस्तीपत्र 

यशस्वी जयसवाल – ५ सामने, ३९१ धावा, सर्वोत्तम १६१, सरासरी ४३.४४, शतक १, अर्धशतकं २

के एल राहुल – ५ सामने, २५५ धावा, सर्वोत्तम ८४, सरासरी ३०.६६, शतक ०, अर्धशतक २

रिषभ पंत – ५ सामने, २५५ धावा, सर्वोत्तम ६१, सरासरी २८.३३, अर्धशतक १

विराट कोहली – ५ सामने, १९० धावा, सर्वोत्तम १००, सरासरी २३.७५, शतक १, अर्धशतक ०

शुभमन गिल – ३ सामने, ९३ धावा, सर्वोत्तम ३१, सरासरी १८.६०

रोहित शर्मा – ३ सामने, ३१ धावा, सर्वोत्तम १०, सरासरी ६.२०

देवदत्त पड्डिकल – १ सामना, २५ धावा, सर्वोत्तम २५, सरासरी १२.५

ध्रुव जुरेल – १ सामना, १२ धावा, सर्वोत्तम ११, सरासरी ६.५

(हेही वाचा- दहिसर ते मीरा-भाईंदर Metro Line – 9 च्या डेपो मार्गात होणार बदल ?; एमएमआरडीएचा मोठ्या आर्थिक बचतीचा दावा)

अष्टपैलू खेळाडूंचं प्रशस्तीपत्रक 

रवींद्र जडेजा –  ३ सामने, १३५ धावा, सर्वोत्तम ७७, सरासरी २७, अर्धशतक १, गोलंदाजीत ४ बळी, सर्वोत्तम ७८/३

नितिश कुमार रेड्डी – ५ सामने, २९८ धावा, सर्वोत्तम ११४, शतक १, सरासरी ३७ गोलंदाजीत ५ बळी, सर्वोत्तम ३२/२

वॉशिंग्टन सुंदर – ३ सामने, ११४ धावा, सर्वोत्तम ५०, सरासरी २२.८०, अर्धशतक १, गोलंदाजीत ३ बळी, सर्वोत्तम २८/२

गोलंदाजांचं प्रशस्तीपत्रक 

जसप्रीत बुमराह – ५ सामने, ३२ बळी, सर्वोत्तम ७६/६, सरासरी १३.०६, डावांत ५ बळी ३ वेळा

मोहम्मद सिराज – ५ सामने, २० बळी, सर्वोत्तम ९८/४, सरासरी ३१.१५

प्रसिद्ध कृष्ण  – १ सामना, ६ बळी, सर्वोत्तम ४२/३, सरासरी १७.८३

नितिश कुमार रेड्डी – ५ सामने, ५ बळी, सर्वोत्तम ३२/२, सरासरी ३८

आकाश दीप – २ सामने, ५ बळी, सर्वोत्तम २८/२, सरासरी ५४

हर्षित राणा – २ सामने, ४ बळी, सर्वोत्तम २८/३, सरासरी ५०.७५

रविचंद्रन अश्विन – १ सामना, १ बळी, सर्वोत्तम ३८/१, सरासरी ५३

(हेही वाचा- भारताला विश्वविजेता होण्याचा विश्वास देणारा अद्भुत कर्णधार Kapil Dev)

बोर्डर गावसकर मालिकेतील कसोटींचे निकाल (ऑस्ट्रेलिया ३-१ ने विजयी)

पर्थ कसोटी – भारतीय संघाचा २९५ धावांनी विजय 

ॲडलेड कसोटी – ऑस्ट्रेलियन संघाचा १० गडी राखून विजय

ब्रिस्बेन कसोटी – अनिर्णित 

मेलबर्न कसोटी – ऑस्ट्रेलियाचा १८४ धावांनी विजय

सिडनी कसोटी – ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून विजय 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.