भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्याला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती. या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताना सामना १ डाव आणि १३२ धावांच्या फरकाने जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७७ धावांवर बाद करून भारताने ४०० धावांचा डोंगर उभारला आणि तब्बल २२३ धावांची आघाडी मिळवली यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाने ९१ धावांवर ऑलआऊट केले.
( हेही वाचा : पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्येचा तपास करण्यासाठी SIT गठीत करणार)
भारताचा मोठा विजय
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ ९१ धावांमध्ये आटोपला आणि भारताने सामना १ डाव आणि १३२ धावांनी जिंकला. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावांमध्ये मिळून ७ तर अश्विनने दोन्ही डावांमध्ये मिळून ८ विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने १२० तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजाने अनुक्रमे ८४ व ७० धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावात ७ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर भारताने मोठ्या फरकाने हा सामना जिंकला.
Join Our WhatsApp Community