- ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आता भारतीय संघ पुढील कसोटीसाठी मेलबर्नला पोहोचला आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्यामुळे उर्वरित दोन कसोटींना महत्त्व प्राप्त झालं आहे. नाताळच्या सणानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ डिसेंबरला मेलबर्न कसोटी सुरू होणार आहे. नाताळ नंतरच्या दिवसाला पारंपरिकदृष्ट्या बॉक्सिंग डे असं म्हटलं जातं. त्यामुळे २६ डिसेंबरला सुरू होणारी कसोटीही बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखली जाते. (Border-Gavaskar Trophy)
या मालिकेचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने भारतीय संघाचा प्रवासाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात भारतीय खेळाडू आपल्या ब्रिस्बेनमध्ये मेलबर्नसाठीचं विमान पकडताना दिसतात. (Border-Gavaskar Trophy)
(हेही वाचा – ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?)
Team India heads to their next battle with focus, pride, and determination! 🇮🇳✈ #TeamIndia is ready for the next episode of the #ToughestRivalry in Melbourne!#AUSvINDOnStar 4th Test 👉 THU, 26th DEC, 4:30 AM on Star Sports! pic.twitter.com/xaRaKdTfBj
— Star Sports (@StarSportsIndia) December 19, 2024
भारतीय संघाने या मालिकेसाठी सिम्युलेशन पद्धतीने सरावाचं धोरण ठेवलं आहे. त्यामुळे उर्वरित सहा दिवस भारतीय संघ त्याच पद्धतीने सराव करणार आहे. मध्ये संघाचा एक सराव सामनाही याच पद्धतीने पार पडणार आहे. मेलबर्नमध्ये भारतीय संघासाठी काही सुखद आठवणीही आहेत. २०२० च्या डिसेंबर महिन्यात बॉक्सिंग डे टेस्टमध्येच भारताने इथं संस्मरणीय विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ही कसोटी ८ गडी राखून जिंकली होती. रहाणेनं पहिल्या डावांत यादगार अशा ११६ धावा केल्या होत्या. भारताने परदेशात मिळवलेला हा एक मोलाचा विजय समजला जातो. कारण, आधीच्या ॲडलेड कसोटीत संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला असताना पुढच्याच कसोटीत भारतीय संघाने बाजी पलटवली होती. इतकंच नाही तर मालिकाही जिंकली होती. (Border-Gavaskar Trophy)
सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना रोहित शर्माचा संघही तशीच कामगिरी इथं करेल का ही उत्सुकता चाहत्यांना आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड अर्थात एमसीजीवर भारतीय संघ आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळला आहे. यातील ४ कसोटी जिंकतानाच ८ भारताने गमावल्या आहेत आणि उर्वरित २ अनिर्णित राहिल्या आहेत. (Border-Gavaskar Trophy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community