Border – Gavaskar Trophy : ‘नितीश रेड्डी हार्दिक पांड्यापेक्षा उजवा’ – सुनील गावसकर

Border - Gavaskar Trophy : अष्टपैलू तेज गोलंदाज म्हणून गावसकरांनी पांड्यापेक्षा नितिशला पसंती दिली

54
Border - Gavaskar Trophy : ‘नितीश रेड्डी हार्दिक पांड्यापेक्षा उजवा’ - सुनील गावसकर
Border - Gavaskar Trophy : ‘नितीश रेड्डी हार्दिक पांड्यापेक्षा उजवा’ - सुनील गावसकर
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेचा आढावा घेतला तर नितीश कुमार रेड्डी हा भारतीय संघाला गवसलेला नवीन तारा आहे असं म्हणावं लागेल. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने मालिकेत सातत्यपूर्ण धावा केल्या. आणि मेलबर्नमध्ये पहिलं आंतरराष्ट्रीय शतकही झळकावलं. २१ वर्षीय नितीशने आता दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांच्याकडूनही वाहवा मिळवली आहे. रेड्डीने मेलबर्नमध्ये पहिल्या डावांत वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२७ धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ४७४ धावसंख्येला उत्तर देताना भारताला ३६९ धावा करता आल्या. (Border – Gavaskar Trophy)

(हेही वाचा- Simhastha Kumbh Mela च्या कामांचा आराखडा सादर करा; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत दिले आदेश)

सुंदरने ५० तर नितीशने ११४ धावा केल्या. आता स्पोर्टस्टार साप्ताहिकासाठीच्या आपल्या स्तंभात सुनील गावसकर यांनी नितीशचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘नितीशसारखा हीरा शोधून काढल्याबद्दल मी आधी अजित आगरकरच्या निवड समितीचं अभिनंदन करतो. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून खेळताना नितिशचं कसब पहिल्यांदा दिसल होतं. पण, तो प्रथमश्रेणी क्रिकेट आणि त्यातही कसोटी क्रिकेट फारसं खेळलं नव्हता. असं असतानाही त्याला संघात स्थान देण्याचा विश्वास निवड समितीने दाखवला. आणि सध्या तो या मालिकेतील सगळ्यात सातत्यपूर्ण फलंदाज ठरला आहे,’ असं गावसकर यांनी लिहिलं आहे. (Border – Gavaskar Trophy)

कसोटीत परिस्थितीचा अंदाज घेत समयोचित फलंदाजी करण्याचं नितीशचं कसब सुनील गावसकरांना महत्त्वाचं वाटतं. नितीश गेल्या हंगामातील आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. आणि त्यानंतर बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला संघात पहिल्यांदा स्थान मिळालं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो पहिल्या कसोटीपासून संघात आहे. आणि आठव्या क्रमांकावर चमकदार कामगिरी करत आहे. (Border – Gavaskar Trophy)

भारतीय संघाला गरज असलेला अष्टपैलू तेज गोलंदाज संघाला गवसल्याची गावसकर यांची भावना आहे. त्याबद्दल ते लिहिलात, ‘हार्दिक पांड्या कसोटी खेळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर संघाला अष्टपैलू तेज गोलंदाजाची गरज होती. ती जागा अधिक समर्थपणे नितीशने भरून काढली आहे. तो पांड्यापेक्षा चांगली फलंदाजी करू शकतो. आणि इथून पुढे तो सहाव्या क्रमांकावर फंलदाजीला यावा.’ (Border – Gavaskar Trophy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.