Border-Gavaskar Trophy : दुसऱ्या ॲडलेड कसोटीसाठी रविचंद्रन अश्विन भारतीय संघात?

Border-Gavaskar Trophy : रोहित शर्मा, शुभमन गिलही दुसऱ्या कसोटीसाठी संघात परततील.

147
Ashwin Retires : अश्विनच्या अचानक निवृत्तीमागे गौतम गंभीरचा हात किती?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने चौथ्याच दिवशी पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. त्यामुळे मालिकेतही भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेत सुरूवात तर चांगली झाली. पण, पुढील कसोटी दिवस रात्र होणार आहे. त्यामुळे वातावरण आणि खेळपट्टीचं वागणं हे सगळंच बदलणार आहे. शिवाय गुलाबी रंगाचा चेंडू कसोटीत वापरला जाईल. या सगळ्यामुळे दुसऱ्या कसोटीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

६ डिसेंबरला ॲडलेड इथं ही कसोटी सुरू होईल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या कसोटीत भारतीय संघात परततील. त्यामुळे पर्थमध्ये खेळलेले कुठले खेळाडू संघाबाहेर जातील अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. संध्याकाळी खेळपट्टीमध्ये होणारे बदल लक्षात घेता या कसोटीत भारतीय संघ अनुभवी फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विनचाही संघात समावेश करू शकतो. तर रोहित आणि शुभमनच्या वापसीमुळे देवदत्त पड्डिकल आणि ध्रुव जुरेलला बाहेर बसावं लागू शकतं.

(हेही वाचा – ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत भारतीय संघ पुन्हा अव्वल)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाच्या उर्वरित खेळाडूंसोबत गेला नाही. वैयक्तिक कारणांमुळे त्याने पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली होती. पण आता तो ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हिटमॅनचे पुनरागमन निश्चित आहे. अशा परिस्थितीत जर रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत सहभागी होणार असेल तर त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दौऱ्यावर संघाचा प्रमुख फलंदाज आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पर्थ कसोटीतून बाहेर राहिला होता, मात्र आता दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे पुनरागमन निश्चित आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर ध्रुव जुरेलला वगळले जाऊ शकते.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनचा ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात समावेश केला जाऊ शकतो. पर्थ कसोटीत अश्विनचा अंतिम अकरामध्ये समावेश नव्हता. पण आता दुसऱ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. अश्विन गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचा विकेट घेणारा गोलंदाज आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत संघात परत आणले जाऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.