- ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावस्कर चषकात भारतीय संघाचा १-३ ने पराभव झाल्यानंतर दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी भारताच्या प्रशिक्षकांच्या ताफ्यावर ताशेरे ओढले आहेत. सिडनी कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाने मालिका तर गमावलीच. शिवाय कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतूनही संघ बाद झाला आणि भारतीय संघाची कामगिरी अशी ढासळत असताना संघाचे प्रशिक्षक काय करत होते, असा सवालच गावस्कर यांनी विचारला आहे. (Border-Gavaskar Trophy)
‘गंभीर आणि त्यांचा प्रशिक्षकांचा ताफा नेमकं काय करतोय? न्यूझीलंड विरुद्ध भारतीय फलंदाज कमी पडले. तेव्हापासून आतापर्यंत ४ महिन्यात ते त्याच चुका करतायत. ऑस्ट्रेलियातही फलंदाजीची ताकद कधी दिसलीच नाही. अशावेळी प्रशिक्षकांना कठीण प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यांनी काय प्रयत्न केले? संघामध्ये सुधारणा का दिसली नाही?’ असा प्रश्न गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना केला. (Border-Gavaskar Trophy)
(हेही वाचा – Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
#SunilGavaskar shares his candid thoughts on how India’s coaching staff may have fallen short during the #BorderGavaskarTrophy. 🇮🇳⚡#AUSvINDonStar #ToughestRivalry #AUSvIND pic.twitter.com/pHwnD3UyWR
— Star Sports (@StarSportsIndia) January 5, 2025
‘चांगल्या चेंडूंवर फलंदाज बाद होत असतील तर ठिक आहे. पण, सामान्य गोलंदाजीवरही फलंदाज सातत्याने बाद होत असतील, तर ती समस्या आहे आणि ती खूप काळ चालू देता कामा नये. मला असा प्रश्न विचारण्यात येतो की, खेळाडू सतत अपयशी होत असताना त्यांना कायम ठेवण्यात यावं का? मला उलट विचारायचंय, प्रशिक्षक अपयशी ठरले असताना त्यांना का कायम ठेवायचं?’ असा संतप्त सवाल गावस्करांनी विचारला. (Border-Gavaskar Trophy)
संघाच्या सरावाच्या पद्धतीवर गावस्करांनी टीका केली. थ्रो-डाऊन सत्र नाही तर सामन्यांचा सराव खेळाडूंना मिळाला पाहिजे आणि खेळाडूंच्या तंत्रावर काम झालं पाहिजे, असं गावस्करांनी शेवटी बोलून दाखवलं. (Border-Gavaskar Trophy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community