Border – Gavaskar Trophy : भारतीय सराव सत्र इतकी गुप्त का? ऑस्ट्रेलियन मंडळाने सांगितलं कारण…

52
Border - Gavaskar Trophy : भारतीय सराव सत्र इतकी गुप्त का? ऑस्ट्रेलियन मंडळाने सांगितलं कारण…
Border - Gavaskar Trophy : भारतीय सराव सत्र इतकी गुप्त का? ऑस्ट्रेलियन मंडळाने सांगितलं कारण…
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या बोर्डर – गावसकर चषक (Border – Gavaskar Trophy) मालिकेविषयीची उत्सुकता अख्ख्या क्रिकेट विश्वाला आहे. मडियामध्येही या मालिकेविषयी बोललं जातंय. जेव्हा एखादा संघ परदेश दौऱ्यावर येतो, तेव्हा संघाचे चाहतेही आपल्या लाडक्या खेळाडूंना अगदी सरावाच्या वेळीही पाहणं चाहत्यांना आवडतं. पण, सध्या भारतीय संघ चाहत्यांना दर्शन देण्याच्या मनस्थितीत नाही. उलट संघाचा सरावही अगदी गुप्तपणे सुरू आहे. अगदी ऑस्ट्रेलियन मीडियानेही याची दखल घेतली आहे. ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने पर्थ मधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात नुतनीकरणाचं काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कंपनीने पाठवलेला एक ईमेल मिळवला आहे. आणि त्यात कामगारांना दिलेल्या सूचना त्यांनी एका अहवालात लिहिल्या आहेत.

त्यानुसार कामगारांनी मैदानात काम करताना भारतीय खेळाडूंचं चित्रण करू नये, त्यांचे फोटो काढू नयेत, ड्रोन चित्रण करू नये आणि खेळाडूंना कुठल्याही प्रकारे व्यत्यय आणू नये असा सूचना या ईमेलमध्ये आहेत. त्यावरून भारतीय संघाचा गुप्ततेचाच विचार अधोरेखित होतो. गेल्या काही दिवसांत फोर्ब्स मासिकाच्या एका पत्रकाराने भारतीय संघाचे काही व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. तर बीसीसीआयने (BCCI) काही फोटो आपल्या ट्विटर खात्यावर प्रसिद्ध केले आहेत. त्या व्यतिरिक्त भारतीय सरावाचे कुठलेही फोटो बाहेर आलेले नाहीत. (Border – Gavaskar Trophy)

(हेही वाचा – उद्धव ठाकरे वापरतात गौतम अदानींचे विमान; Nitesh Rane यांनी केली पोलखोल)

(हेही वाचा – Mohammed Shami अर्ध्यातच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल का?)

पण, या सगळ्या बातम्यांनंतर एक बातमी समोर आली आहे. शुकवार ते रविवार भारतीय संघ भारतीय ए संघाबरोबर एक अनधिकृत सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी अ संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. शिवाय शुक्रवारपासून भारतीय संघाचं मुख्य मैदानात कसोटी दर्जाच्या खेळपट्टीवर सराव सुरू होईल. या सरावासाठी भारताने चाहत्यांना परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे भारतात बीसीसीआयमधील (BCCI) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या गुप्तता बाळगण्याचं खंडन केलं आहे.

‘बीसीसीआय (BCCI) किंवा संघ प्रशासनाकडून ऑस्ट्रेलियन मंडळाला कुठल्याही सूचना गेलेल्या नाहीत,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. भारतीय संघ आणि ए संघांदरम्यानचा सामना हा फलंदाज विरुद्ध गोलंदाज असा असेल असं सांगण्यात येतंय. म्हणजे एका संघात सगळे गोलंदाज असतील आणि दुसऱ्या संघात फलंदाज. यामुळे दोघांनाही विविध प्रकारच्या शैलीशी खेळण्याचा सराव मिळतो. भारताने कोव्हिडच्या काळात इंग्लंडमध्येही असाच सराव केला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.