वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणालची राज्य स्तरावर ‘सुवर्ण’ कामगिरी, आता लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धा

135
वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल झरेकरने 86 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. 24 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अकोला येथे आयोजित 91व्या एलिट मेन्स राज्य स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. आता मृणाल हा डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात हरियाणा येथे होणार्‍या एलिट मेन्स राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहे.
वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या बॉक्सर्सनी 22 ते 26 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कांदिवली पूर्व येथे झालेल्या पोनसूर जिमखाना बॉक्सिंग स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामध्ये काही स्पर्धकांनी रौप्य पदके जिंकली, तर खालील बॉक्सर्सनी सुवर्ण पदके आणि वैयक्तिक पुरस्कार जिंकले आहेत.
  • कु. मार्दवी भोसले –  सुवर्णपदक आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सर पुरस्कार.
  • कु. भूमी मेहेर – रौप्य पदक आणि सर्वोत्कृष्ट चॅलेंजर पुरस्कार.
  • कु. जागृती बोथ – सुवर्ण पदक
  • कौशल केवट – सुवर्ण पदक
  • आदित्य गुप्ता – सुवर्ण पदक
  • द्रोण कडू – सुवर्ण पदक
  • शालान खान – सुवर्ण पदक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.