-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी नको त्या गोष्टीसाठी वादात सापडला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कोन्टासला चुकीच्या पद्धतीने धक्का दिल्यामुळे विराटवर कारवाई होणार आहे. आणि त्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम कापून घेण्यात येईल. खरंतर विराटची दंडावर सुटका झाली असंच म्हणावं लागेल. कारण, मैदानावर सगळं आलबेल असताना विराट खेळपट्टीचे २२ यार्ड कोन्टासच्या दिशेनं चालत गेला. आणि दोघं जवळ आल्यावर विराट बाजूला न होता चालतच राहिला. त्याचा खांदा कोन्टासला लागला. (Boxing Day Test )
(हेही वाचा- Boxing Day Test : मेलबर्नमध्ये पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, दिवस अखेर ६ बाद ३११ धावा)
मैदानावर खेळाडू, पंच, सपोर्ट स्टाफ आणि मैदानावरील कुठल्याही अधिकृत व्यक्तीला हेतुपुरस्सर धक्का दिल्याचं किंवा चुकीच्या पद्धतीने शारीरिक स्पर्श केल्याचं सिद्ध झालं तर ती गैरवर्तणूक धरण्यात येते. आणि त्यासाठी खेळाडूला दंड किंवा गुन्हा गंभीर असेल तर एखाद्या सामन्याची बंदीही लागू शकते. मैदानावरील पंचांनी हा प्रसंग घडल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कोन्टास तसंच उस्मान ख्वाजा यांच्याशी चर्चा केली. (Boxing Day Test )
🚨 VIRAT KOHLI HAS BEEN FINED 20% OF HIS MATCH FEES…!!! 🚨 pic.twitter.com/UhQX85YWJf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
त्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनीही दोन्ही खेळाडूंशी चर्चा केली. विराटने जाणीवपूर्वक हे कृत्य केलं नसल्याचं सांगितलं. तर सॅम कोन्टासनेही या प्रकरणानंतर विराटशी संवाद साधला. त्यानंतर पायक्रॉफ्ट यांनी हा आयसीसीच्या २.१२ चा भंग असल्याचा निर्वाळा दिला. विराटने केलेली चूक जाणीवपूर्पवक केलेली होती. पण, त्यामुळे खेळाडूला जास्त इजा पोहोचली नाही आणि विराटने नंतर खेळाडूशी संवादही साधला असं मत व्यक्त करत विराटला १ डिमेरिट गुण दिला. त्यामुळे विराटवर दंडाची कारवाई झाली. जर २ किंवा ३ डिमेरिट गुण मिळाले असते तर विराटवर एका कसोटी सामन्यासाठी बंदीही येऊ शकली असती. (Boxing Day Test )
(हेही वाचा- Maharashtra Growth Story Conclave पर्व ४ संपन्न; मान्यवरांनी दिले उद्योजकतेचे धडे)
क्रिकेट खेळात खेळाडूंचा एकमेकांशी स्पर्श होत नसल्यामुळे या खेळातील स्पर्शाचे नियम वेगळे आहेत. आणि काहीसे कठोर आहेत. पण, या सामन्यात कोन्टासनेही मवाळ भूमिका घेतल्यामुळे विराटची सुटका झाली आहे. ‘विराट हा माझ्यासाठी आदर्श खेळाडू आहे. मी त्याला पाहतच मोठा झालो आहे,’ अशी प्रतिक्रिया दिवसाचा खेळ संपल्यावर सॅम कोन्टासने दिली आहे. तर रवी शास्त्रीने अशाप्रकारच्या वर्तनाची गरज नव्हती, विराटने गैरवर्तनाची रेषा ओलांडून चूक केली, असं मत व्यक्त केलं. (Boxing Day Test )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community