-
ऋजुता लुकतुके
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावांत ४७४ धावांचा डोंगर उभा करत निम्मं काम केलं आहे. ६ बाद ३११ धावसंख्येवरून त्यांनी दुसरा डाव सुरू केला. आणि पहिल्या सत्रावर पुन्हा एका वर्चस्व गाजवलं. यावेळी स्टिव्ह स्मिथला साथ मिळाली ती कर्णधार पॅट कमिन्सची. जसप्रीत बुमराहने सुरुवातीची काही षटकं स्मिथची परीक्षा पाहिली. पण, पहिला एक तास सावधपणे खेळून काढल्यावर या जोडीने फटकेबाजी सुरू ठेवली. आणि षटकामागे ४ धावांच्या गतीने धावा करणं सुरूच ठेवलं. शिवाय बुमराह खेरीज इतर तेज गोलंदाज अगदीच बोथट होते. सिराजने आपल्या २३ षटकांतच १२३ धावा लुटल्या. आणि रोहितने कर्णधार म्हणून दोन्ही फिरकीपटूंना थेट ४० व्या षटकानंतर गोलंदाजीला आणलं. त्यामुळे एकट्या बुमराहवर गोलंदाजीचा भार पडला. आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याचा अप्रत्यक्ष फायदाच झाला. स्मिथ आणि कमिन्स यांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागिदारी रचली. आणि महत्त्वाचं म्हणजे धावसंख्या ४०० पार नेली. (Boxing Day Test)
(हेही वाचा- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द)
स्टिव्ह स्मिथने मालिकेतील सलग दुसरं शतक झळकावलं. सगळ्यात आधी कमिन्स ४९ धावांवर बाद झाला. जडेजाला हा बळी मिळाला. तर आकाशदीपच्या गोलंदाजीवर स्मिथ दुर्दैवीरित्या त्रिफळाचित झाला. त्यानंतर जडेजा आणि बुमरानेच तळाची फलंदाजी कापून काढली आणि ऑस्ट्रेलियन संघ ४७४ धावांत सर्वबाद झाला. (Boxing Day Test)
Innings Break!
Australia are all out for 474 runs.
4/99 – Jasprit Bumrah
3/78 – Ravindra JadejaScorecard – https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/IHyCweNUV1
— BCCI (@BCCI) December 27, 2024
त्यानंतर भारतीय फलंदाजी सुरू झाली आहे. आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. आणि त्यानंतर पॅट कमिन्सने के. एल. राहुलचाही चहापानापूर्वी शेवटच्या चेंडूवर काटा काढला आहे. राहुल चांगल्या सुरुवातीनंतर २३ धावांवर बाद झाला. चहापानाने भारतीय संघाने २ बाद ५१ धावा केल्या आहेत. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Boxing Day Test : विराट कोहलीला यापूर्वी कधी गैरवर्तणुकीसाठी दंड झाला होता?)
दुसऱ्या दिवसाची दोन्ही सत्रं ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावरच लागली आहेत. आणि यात स्टिव्ह स्मिथचा वाटा मोठा आहे. त्याने १९७ चेंडूंत १४० धावा केल्या. आणि यात ३ उत्तुंग षटकार आणि १६ चौकार लागवले. या कसोटीत कोन्स्टास आणि स्मिथ या दोन फलंदाजांनी अगदी बुमरालाही षटकार लगावण्याचं धारिष्ट्य दाखवलं. शिवाय स्मिथचं भारताविरुद्धचं हे अकरावं शतक होतं. (Boxing Day Test)
Unusual mode of dismissal for Steve Smith 👀pic.twitter.com/SqmkGnutuc
— The Khel India (@TheKhelIndia) December 27, 2024
आकाशदीपचा चेंडू स्मिथच्या बॅटला लागून पॅड्सवर आदळला. आणि त्यानंतर तो यष्टीवरून जाऊन एक बेल खाली पडली. त्यामुळे स्मिथला माधारी परतावं लागलं. पण, या मैदानावरील स्मिथचं हे पाचवं शतक होतं. आणि भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील अकरावं शतक होतं. भारताविरुद्धच्या यशस्वी कसोटी फलंदाजांची कामगिरी पाहूया, (Boxing Day Test)