-
ऋजुता लुकतुके
बॉक्सिंग डे कसोटीत पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर लागेल. नाणेफेकीपासून सगळं ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या बाजूने घडत गेलं. त्याने पहिली फलंदाजी घेतली. आणि पहिल्या सत्रात नवीन सलामीवीर सॅम कॉन्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी धुवाधार फलंदाजी केली. कोन्टासची ही पहिली कसोटी होती. पण, या मालिकेत दबदबा निर्माण करणाऱ्या बुमराहविरुद्ध खेळताना तो अजिबात गडबडला नाही. उलट त्याने सुरुवातीपासून बुमराहला लक्ष्य केलं. त्याच्या ३३ चेंडूंवर कोन्टासने ३४ धावा वसूल केल्या. आणि यात त्याने चक्क दोन षटकारही मारले. (Boxing Day Test)
(हेही वाचा- IRCTC ची वेबसाईट अन् ॲप डाऊन; आयआरसीटीसीनं सांगितलं नेमकं कारणं …)
कोन्टासने ऑस्ट्रेलियासाठी दमदार सुरूवात करून दिली. आणि डावाचा वेगही निर्धारित केला. २० व्या षटकात तो बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ८९ धावा झालेल्या होत्या. आणि त्यातल्या ६० एकट्या कोन्टासने केल्या. अखेर रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तो चकला. आणि बाद झाला. तो बाद झाल्यावरही ख्वाजा आणि लबुशेन यांनी धावांचा ओघ सुरूच ठेवला. त्यांनी आणखी ६५ धावा वाढवल्या. दुसऱ्या सत्रात बुमरा आणि आकाशदीप यांनी थोडीफार फटकेबाजीला खीळ घातली. खेळपट्टीकडून मदत मिळत नाही हे पाहून बुमराने चेंडूच्या दिशेतही बदल केला. आणि ते प्रभावी ठरलं. त्यानेच उस्मान ख्वाजाला ५७ धावांवर बाद केलं. (Boxing Day Test)
That’s Stumps on Day 1
Australia reach 311/6 with Jasprit Bumrah leading the way with 3️⃣ wickets
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/8CPfzzk1gH
— BCCI (@BCCI) December 26, 2024
मार्नस लबुशेनचा काटा वॉशिंग्टन सुंदरने काढला. त्यानेही ७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आरामात ३०० धावांचा टप्पा तो ही पहिल्याच दिवशी गाठला आहे. दिलाशाची गोष्ट इतकीच की, दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रांत मिळून ऑस्ट्रेलियाचेही ५ फलंदाज बाद झाले. आणि त्यात धोकादायक ट्रेव्हिस हेडला बुमराहने शून्यावर बाद केलं. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक)
स्टिव्ह स्मिथ मात्र ६८ धावांवर नाबाद आहे. आणि त्याच्या जोडीला कर्णधार पॅट कमिन्स खेळतोय. ऑस्ट्रेलियन संघाचा आता प्रयत्न असेल तो दुसऱ्या दिवशी वेगाने धावा वाढवण्याचा. आणि भारतीय संघाचा प्रयत्न असेल ऑस्ट्रेलियन संघाला गुंडाळून फलंदाजांना पुरेसा वेळ द्यायचा. भारताकडून बुमराहने ७५ धावांत ३ तर सुंदर, जडेजा आणि आकाशदीपने प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. (Boxing Day Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community