Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत आठव्या जोडीचा प्रतिकार, नितीश रेड्डीची शतकाला गवसणी

Boxing Day Test : भारताचने पहिल्या डावांत ९ बाद ३५८ धावा केल्या

55
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत आठव्या जोडीचा प्रतिकार, नितीश रेड्डीची शतकाला गवसणी
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत आठव्या जोडीचा प्रतिकार, नितीश रेड्डीची शतकाला गवसणी
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिकेत पुन्हा एकदा भारतीय शेपूट वळवळलं आणि नितीश कुमार रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने शतकी भागिदारी करून भारतीय संघाला फॉलो ऑनच्या संकटातून तर वाचवलंच. शिवाय साडे तीनशे धावांचा टप्पाही आरामात पार करून दिला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची खेळपट्टी तिसऱ्या दिवशीही फलंदाजांना पुरेपूर मदत करत होती. आणि त्याचा फायदा आघाडीच्या फळीला तितका उचलता आला नसला तरी तळाच्या फलंदाजांनी संघाला हात दिला. आधी जडेजा आणि पंतनेही प्रतिकार केला. तरी रिषभ पंत २८ धावा करून अतिशय बेजबाबदार फटका मारून बाद झाला. त्यानंतर जडेजालाही १७ धावांवर लायनने पायचित पकडलं. तेव्हा भारताची अवस्था ७ बाद २२१ होती. आणि फॉलो ऑन टाळण्यासाठी संघाला आणखी ५३ धावांची गरज होती. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Punjab Accident News : ओव्हरस्पीड बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 24 हून अधिक जखमी)

पण, शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत सुंदर जे बोलला होता ते त्याने खरं करून दाखवलं. त्याच्या फलंदाजीत ती सकारात्मकता दिसून आली. दुसरीकडे नितीश रेड्डी या मालिकेतील फॉर्मवर स्वार होत त्याच्या गतीने धावा करत होता. या जोडीने धावांचा वेगही कायम ठेवला. त्यामुळे कुठलीही अडचण न येता भारताचा फॉलो ऑन दुसऱ्या सत्रात टळला.  (Boxing Day Test)

दोघांनी दीड शतकी भागिदारी अगदी जलद गतीने पूर्ण केली. अखेर नॅथन लायनने ११२ व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने एका अप्रतिम चेंडूंवर वॉशिंग्टन सुंदरला ५० धावांवर बाद केलं. तोपर्यंत वॉशिंग्टनने स्टार्क, कमिन्स, बोलंड आणि लायन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चौकडीचा समर्थ मुकाबला केला. फटकेबाजीची अजिबात घाई केली नाही. त्याच्या १६२ चेंडूंच्या खेळीत सुंदरने फक्त एक चौकार लगावला. इतका त्याचा बचाव भक्कम होता. आणि त्याने नितीशला दुसऱ्या बाजूला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या गड्यासाठी १२७ धावांची भागिदारी केली. (Boxing Day Test)

(हेही वाचा- GDP Growth : चालू आर्थिक वर्षांत विकास दर ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अर्थ मंत्रालयाचा अंदाज)

सुंदर बाद झाल्यावर नितीश रेड्डीने बुमराह, सिराज या तळाच्या फलंदाजांचा बचाव करत एकेरी धावा नाकारल्या. त्यामुळे काही काळ नाट्य निर्माण झालं होतं. नितिश ९९ वर नाबाद असताना बुमराह बाद झाला. आणि शेवटची भारतीय जोडी मैदानात असताना नितीश रेड्डी दुसऱ्या बाजूला होता. पण, सिराजने कमिन्सचे तीन चेंडू खेळून काढले. आणि नितीशला शतकाची संधी मिळाली. आणि पुढच्या बोलंडच्या षटकात नितिशने शतक पूर्ण केलं. (Boxing Day Test)

खराब हवामानामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या ९ बाद ३५८ धावा झाल्या होत्या. भारताने ऑस्ट्रेलियाची आघाडी ११६ इतकी कमी केली आहे. आणि कसोटीचे दोन दिवस बाकी असताना रंगत निर्माण झाली आहे.  (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.