Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक

Boxing Day Test : मालिकेतील १-१ बरोबरीमुळे ही कसोटी महत्त्वाची आहे

39
Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक
Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिका आता निर्णायक टप्प्यात आली आहे. या कसोटीत बरोबरीची कोंडी फोडण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. आणि ही गोष्ट कशी साध्य करायची याचं गणित भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी मांडलं आहे. पारंपरिकरित्या कसोटीत पहिल्या डावांतील धावसंख्येला महत्त्व आहे. आणि या कसोटीतही तेच महत्त्वाचं ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Hiraman Khoskar : … आणि “या” आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा)

‘कसोटी सामना आरामात जिंकायचा असेल आणि खेळपट्टी अगदीच गोलंदाजांना धार्जिणी नसेल, तर ती जिंकण्याचं गमक म्हणजे पहिल्या डावांत भरपूर धावा करणे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दडपण येतं. आणि गोलंदाजांनाही बळ येतं. पहिल्या चार फलंदाजांपैकी एकाने जरी मोठं शतक केलं तर हे सहज शक्य होतं. त्यामुळे भारतीय संघाकडूनही मेलबर्नमध्ये तीच अपेक्षा असेल,’ असं राजपूत यांनी म्हटलं आहे. (Boxing Day Test)

राजपूत सध्या संयुक्त अरब अमिराती संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत राजपूत आश्वस्त आहेत. ‘बुमराह भेदक गोलंदाजी करतोय. त्याला आकाशदीप आणि नितिश रेड्डीची साथ मिळाली, तर भारताचं निम्मं काम होईल. आणि फलंदाज चमकले तर गोलंदाजांनाही विश्वास येतो. जडेजा बॅट आणि चेंडू अशा दोन्हीत चांगली कामगिरी करतोय. बुमराहवर अतिरिक्त ताण असल्याचं चित्र दिसत असलं तरी गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना बळी मिळाले तर कामगिरी जास्त अधोरेखित होईल. आता फलंदाजांनी खेळ उंचावण्याची गरज आहे,’ असं राजपूत यांचं म्हणणं पडलं. (Boxing Day Test)

(हेही वाचा- IRCTC ची वेबसाईट अन् ॲप डाऊन; आयआरसीटीसीनं सांगितलं नेमकं कारणं …)

या मालिकेत आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली. तर रोहित आणि विराटही कारकीर्दीच्या उत्तरार्धात आहेत. अशावेळी संघाच्या भवितव्याची काळजी लालचंद रजपूत यांना वाटत नाही. ‘संघ स्थिंत्यतराच्या अवस्थेत आहे. आणि प्रत्येकाला त्यातून जावं लागतं. चांगले खेळाडू गेले तरी चांगलेच संघात येतील हे नक्की. भारताचा अ संघ सक्षम आहे,’ असं मत राजपूत यांनी व्यक्त केलं. (Boxing Day Test)

राजपूत यांनी २००७ ते २००८ या दीड वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. रोहीत आणि विराट यांचा संघात प्रवेश त्यांच्याच काळात झाला आहे. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.