-
ऋजुता लुकतुके
या मालिकेतील खराब कामगिरीमुळे माजी कसोटीपटू सुनील गावसकर तेज गोलंदाज मोहम्मद सिराजवर चिडले आहेत. त्याच्या कामगिरीचं नीट मूल्यमापन करा. आणि गरज पडल्यास त्याला चक्क सिडनी कसोटीतून वगळा, असं गावसकर यांनी म्हटलं आहे. मागच्या ७ डावांमध्ये सिराजने फक्त १३ बळी मिळवेल आहेत. आणि नवीन चेंडू हाताळताना त्याच्या गोलंदाजीत ती धारही दिसलेली नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम झालाय तो जसप्रीत बुमरावर. तो भारतीय गोलंदाजीची एकहाती धुरा वाहत आहे. आणि त्याच्यावर अतिरिक्त ताण पडताना दिसतोय. (Boxing Day Test)
शिवाय सिराजने या मालिकेत षटकामागे ४ धावांच्या गतीने धावा लुटल्या आहेत. जेव्हा एखादा खेळाडू इतका निष्प्रभ ठरत असेल तेव्हा खेळाडूला समज देण्याची गरज असते, असं गावसकर यांना वाटतं. ‘तुला विश्रांती नाही, तर खराब कामगिरीमुळे वगळण्यात येत आहे, असं स्पष्टपणे सांगून सिराजला तंबूत बसवण्याची वेळ आली आहे. विश्रांती वगैरेची भाषा केली तर खेळाडूला गांभीर्य दिसत नाही,’ असं गावसकर यांचं मत पडलं. (Boxing Day Test)
फक्त सिराजच नाही तर रोहित शर्माच्या फॉर्मचीही गावसकर यांना काळजी वाटते. ‘रोहितचे रिफ्लेक्सेस आता कमजोर ठरत आहेत. दुसऱ्या बाजूने यशस्वी जयसवाल चेंडूचा चांगला अंदाज घेत असताना रोहित कमी पडला. आणि त्याच्या पायाच्या हालचाली कमालीच्या कमजोर आहेत,’ असं निरीक्षण गावसकर यांनी नोंदवलं. (Boxing Day Test)
रोहितने या मालिकेत आतापर्यंत फक्त २८ धावा केल्या आहेत. आणि त्याच्या फॉर्ममुळे फलंदाजीचा क्रमही धड ठरवता येत नाहीए. काहींनी तर आक्रमक प्रतिक्रिया देताना सिडनी कसोटीपूर्वीच रोहीतने निवृत्ती स्वीकारावी, नाहीतर कप्तानीचा राजीनामा द्यावा, अशी टीका केली आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा- पाकिस्तान देणार Bangladesh Army ला प्रशिक्षण; भारतासाठी धोक्याची घंटा)
रोहितच्या कामगिरीचा परिणाम त्याच्या कप्तानीवर होतोय. आणि ब्रिस्बेन कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणं, मेलबर्न कसोटीत शुभमनला वगळून वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश आणि नंतर सुंदरला ५० षटकं गोलंदाजीच न देणं अशा चुका त्याच्याकडून झाल्या आहेत. (Boxing Day Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community