- ऋजुता लुकतुके
मेलबर्न कसोटीत आधीच्या खेळपट्टीच्या तुलनेत तेज गोलंदाजांना कमी मदत मिळणार आहे. चेंडू थोडा खाली राहत असल्यामुळे गोलंदाजीतील विविधता थोडी कमी होईल. भारतीय संघ सराव करताना ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली. चेंडूचा वेग एमसीजीवर आधीच्या तुलनेत कमी असेल. पण, सरावात तरी जसप्रीत बुमराह या आव्हानाला सामोरं जायला तयार होता. त्याने चेंडूचा कोन आणि दिशा बदलली. त्यामुळे फलंदाजांची परीक्षा जर कुणी पाहिली असेल तर ती एकट्या जसप्रीत बुमराहनेच. या मालिकेत तो दोन्ही संघांमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. (Boxing Day Test)
पण, संघातील इतर गोलंदाजांनी त्याला म्हणावी तशी साथ दिलेली नाही. गोलंदाजांचं हे अपयश ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ ब्रिस्बेनमध्ये फलंदाजी करत होते तेव्हा जास्त उठून दिसलं. पण, हे दोन बळीही नवीन चेंडूवर बुमराहनेच मिळवलं. इतकंच नाही तर भारतीय संघ फॉलो ऑनच्या छायेत असताना बुमराहनेच आकाशदीपच्या साथीने भारतीय डाव सावरला. तर पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचं यशस्वी नेतृत्व केलं. त्यामुळे मुख्य अस्त्र असलेल्या बुमराहला सांभाळून वापरायचं तर या मालिकेत त्याच्यावरील जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत. (Boxing Day Test)
(हेही वाचा – Boxing Day Test : के. एल. राहुल अनोख्या हॅटट्रीकच्या जवळ)
या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या एकूण बळींपैकी ४४ टक्के बळी एकट्या बुमराहने घेतले आहेत. अनेकदा त्यांना कोंडीत पकडलं आहे. पण, त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. हर्षित राणाला पहिल्या दोन कसोटींनंतर बदलावं लागलं. आकाशदीपने चांगली गोलंदाजी केली. पण, त्याला बळी मिळाले नाहीत. तर मोहम्मद सिराजचे मैदानावर वाद झाले. पण, त्या प्रमाणात बळी मिळालेले नाहीत. आकाशदीपनेही काही दिवसांपूर्वी गोलंदाजांची ही अवस्था मीडियाशी बोलताना कबूल केली. ‘संघ म्हणून बुमराहवर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता. ते कामगिरी करतातच,’ पण, यात इतर गोलंदाज त्यांचा वाटा उचलत नाहीएत हेच अधोरेखित होत होतं. (Boxing Day Test)
‘मी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा खेळतोय. त्यामुळे इथला अनुभव नाहीए. पण, बुमराह ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, त्याचा उपयोग होतो,’ असं आकाशदीपने सांगितलं. आकाशदीपने स्टिव्ह स्मिथला अनेकदा बुचकाळ्यात पाडलं. पण, नेमका त्याचा बळी मिळवण्यात तो अपयशी ठरला. पण, आता मेलबर्नमध्ये बुमराबरोबरच इतरांनाही बळी मिळवावे लागणार आहेत आणि त्यासाठी जसप्रीत बुमराहकडूनच प्रेरणा घ्यावी लागेल. (Boxing Day Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community