-
ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानची मालिकेतील चौथी कसोटी २६ डिसेंबरला मेलबर्न इथं होणार आहे. या मालिकेतील पहिली पर्थ कसोटी भारतीय संघाने २९५ धावांनी जिंकली. पण, नंतरच्या ॲडलेड कसोटीत भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव झाला. तर तिसरी ब्रिस्बेन कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे ही मालिका सध्या १ – १ अशी बरोबरीत आहे. आणि संघाचा फॉर्मही समसमान अवस्थेत आहे. फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव ही दोन्ही संघांची डोकेदुखी ठरली आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा- ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत)
आणि अशावेळी दोन्ही संघ बॉक्सिंग डेच्या दिवशी आमने सामने येत आहेत. अशावेळी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील फलंदाजी आणि गोलंदाजीचे काही विक्रम पाहूया, आताच्या खेळाडूंपैकी जसप्रीत बुमराह आणि स्टिव्ह स्मिथ हे दोन्ही खेळाडू इथं विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. (Boxing Day Test)
-
एमसीजीवर खेळलेल्या ११६ कसोटींपैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल ६७ जिंकल्या आहेत. तर ३२ गमावल्यात आणि १७ अनिर्णित राखल्या आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी आहे ६० टक्के (Boxing Day Test)
-
भारताने इथं खेळलेल्या १४ कसोटींपैकी ४ जिंकल्या आहेत, ८ गमावल्या आहेत तर उर्वरित २ अनिर्णित राखल्या आहेत. २०१४ पासून भारतीय संघ इथं हरलेला नाही. (Boxing Day Test)
-
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इथं खेळलेल्या ११ कसोटींत १२८ धावांच्या सरासरीने १,६७१ धावा केल्या आहेत. या मैदानावरील ते सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहेत. (Boxing Day Test)
-
स्टिव्ह स्मिथने या मैदानावर ११ कसोटींत १,०९२ धावा केल्या आहेत. यात ४ शतकं आहेत. २०१४ च्या अनिर्णित राहिलेल्या कसोटींत स्मिथने १९२ धावांचं योगदान दिलं होतं. (Boxing Day Test)
-
या मैदानावरील भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे तो सचिन तेंडुलकर. त्याने ५ कसोटींत ४४ धावांच्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. (Boxing Day Test)
-
जसप्रीत बुमराहने २ कसोटी सामन्यांमध्ये १३ धावांच्या सरसरीसह इथं १५ बळी मिळवले आहेत. आणि अनिल कुंबळेसह सध्या सर्वाधिक बळींच्या यादीत तो भारतीय गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिला आहे. पण, कुंबळेचा विक्रम तो यंदा मोडू शकतो. (Boxing Day Test)
-
भागवत चंद्रशेखर या एकमेव भारतीय गोलंदाजाने या मैदानावर कसोटींत १० बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. चंद्रशेखर यांनी १९७७-७८ च्या मालिकेत ११२ धावा देत १२ बळी मिळवले होते. (Boxing Day Test)
-
या मैदानावर फक्त एकाच फलंदाजाने आतापर्यंत त्रिशतकी कामगिरी केली आहे. १९६६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॉब कॉपरने इंग्लंडविरुद्ध ३०७ धावा केल्या होत्या. (Boxing Day Test)
-
२०१७ मध्ये ॲलिस्टर कूकने या मैदानावर २४४ धावा केल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. (Boxing Day Test)
-
१९९४ मध्ये इंग्लंड विरुद्ध शेन वॉर्नने इथं हॅट ट्रीक नोंदवली होती. या मैदानावरील ही एकमेव हॅट-ट्रीक आहे. (Boxing Day Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community