Boxing Day Test : के. एल. राहुल अनोख्या हॅटट्रीकच्या जवळ

Boxing Day Test : के. एल. राहुल या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

46
Boxing Day Test : के. एल. राहुल अनोख्या हॅटट्रीकच्या जवळ
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची चौथी कसोटी येत्या २६ तारखेपासून ऐतिहासिक मैलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू होत आहे. आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित दोन कसोटी जिंकणं आवश्यक आहे आणि त्यासाठी फलंदाजांनी जबाबदारी उचलण्याची गरज आहे. सध्या आघाडीच्या आणि मधल्या फळीत एकमेव भारतीय फलंदाज सातत्याने फलंदाजी करतोय तो आहे के. एल. राहुल. त्या तळाच्या फलंदाजांमध्ये नितिश रेड्डी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. (Boxing Day Test)

राहुलकडूनच मेलबर्नमध्येही भारताला आशा असेल. रोहित शर्मा आपल्या मुलाच्या जन्मासाठी सुट्टीवर गेला आणि पहिली पर्थ कसोटी तो खेळू शकला नाही. त्यामुळे राहुलला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच कसोटीत दुसऱ्या डावांत यशस्वी जयस्वालसह त्याने २०१ धावांची सलामी रचली. ता या जागी तो स्थिरावला आहे. आतापर्यंतच्या ६ डावांमध्ये ४७ धावांच्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे ८४. (Boxing Day Test)

(हेही वाचा – Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी)

मेलबर्नच्या कसोटीत एक अनोखा विक्रम त्याला खुणावत आहे. बॉक्सिंग डे कसोटींत सलग तीन शतकांची संधी त्याला आहे. बॉक्सिंग डे ही परंपरा राष्ट्रकूल देशांमध्ये पाळली जाते. राहुलने २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत १२३ धावांची दमदार खेळी केली होती. ती कसोटीही भारताने जिंकली होती. त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा त्याच ठिकाणी राहुलने १०१ धावा केल्या. पण, ही कसोटी भारताने गमावली. (Boxing Day Test)

आता तो पुन्हा एकदा बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहे ती ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध. विशेष म्हणजे मेलबर्न हे त्याचं पदार्पणाचं मैदान आहे. २०१४ मध्ये तो इथं पदार्पणाची कसोटी खेळला होता. पण, त्याची कामगिरी चांगली झाली नाही. तो ३ आणि १ धावा करून बाद झाला. २०२४ वर्षात राहुलने ८ कसोटींमध्ये ३९ धावांच्या सरासरीने ४६९ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे ८६. (Boxing Day Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.