-
ऋजुता लुकतुके
रोहित शर्माचा फलंदाजीचा क्रम या मालिकेत दुसऱ्यांदा बदलला. पण, ना फलंदाजीचं तंत्र बदललं, ना नशीब. त्यामुळे खेळलेल्या पहिल्याच षटकात रोहीत ५ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहितने कमिन्सला पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडूची उंची त्याला नेमकी समजली नसावी. त्यामुळे त्याचा अंदाज साफ चुकला. आणि चेंडू मिड – ऑनला हवेत उडला. आणि बोलंडने झेल टिपण्यात कसूर केली नाही. त्यामुळे मेलबर्नचा पहिला डावही रोहितसाठी विसरावा असाच ठरला आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ४७४ धावांचा डोंगर, स्टिव्ह स्मिथचं ३४ वं शतक )
जसप्रीत बुमराह (९९ धावांत ४) आणि रवींद्र जडेजा (७८ धावांत ३) यांनी ऑस्ट्रेलियन संघ ४७४ धावांत संपवल्यावर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानुसार रोहित सलामीला खेळायला आला. संघासमोर धावांचा मोठा डोंगर असल्यामुळे रोहितने जबाबदारी खेळण्याचीच अपेक्षा त्याच्याकडून होती. त्याने कमिन्सला सरळ ड्राईव्ह करत तीन धावाही सुरुवातीला वसूल केल्या. पण, षटकातील पाचव्या चेंडूवर मात्र रोहित साफ चकला. चेंडू त्याच्या बॅटची वरची कडा घेऊन हवेत उडाला. (Boxing Day Test)
Indian skipper Rohit Sharma is gone for just three runs! #AUSvIND pic.twitter.com/m1fLiqKLO7
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2024
रोहितनंतर राहुल आणि जयसवाल यांनी चहापानापर्यंत तग धरण्याचा प्रयत्न केला. पण, चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर के. एल. राहुल २४ धावांवर त्रिफळाचित झाला. भारतीय फलंदाजांसमोर आता आव्हान आहे ते फॉलो ऑन टाळण्याचं. कमिन्सने दुसऱ्या सत्रातील दोनही भारतीय बळी मिळवले आहेत. आणि कमिन्सने रोहित शर्माला १३ डावांमध्ये पाचव्यांदा बाद केलं आहे. एका कर्णधाराने प्रतिस्पर्धी कर्णधाराला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या बाबतीत आता कमिन्सने इमरान खान आणि रिची बेनॉ यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Mumbai Weather : मुंबई धुक्यात हरवली; हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट)
प्रतिस्पर्धी कर्णधाराला बाद करणारे कर्णधार,
रिची बेनॉ विरुद्ध टेड डेक्सटर – ५
इमरान खान वि. सुनील गावसकर – ५
पॅट कमिन्स वि. रोहित शर्मा – ५
रिची बेनॉ वि. गुलाबराय रामचंद – ४
क्लाईव्ह लॉईड वि. कपिल देव – ४
रिची बेनॉ वि. पीटर मे – ४
हेही पहा-
Join Our WhatsApp Community