- ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेतील ॲडलेड आणि ब्रिस्बेनच्या कसोटीत (Boxing Day Test) भारतीय संघाने रोहित शर्माला (Rohit Sharma) सहाव्या क्रमांकावर खेळवलं. पण, रोहित तीन डावांमध्ये अपयशीच ठरला. त्याने एकूण १९ धावा केल्या. त्यानंतर आता मेलबर्नमध्ये रोहित सलामीलाच येणार हे स्पष्ट झालं आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी तसं सुतोवाच केलं. रोहित सलामी येईल. आणि भारताने शुभमन गिलला (Shubman Gill) या कसोटीतून वगळलं आहे. त्यामुळे त्याच्या जागी म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर के एल राहुल (KL Rahul) खेळेल.
🚨 ROHIT SHARMA LIKELY TO OPEN. 🚨
– Abhishek Nayar said, “Rohit will be opening for us”. pic.twitter.com/z3lBgg5klE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
(हेही वाचा – परिवहन विभाग सुरु करणार ‘स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा)
‘हो. रोहित (Rohit Sharma) आघाडीलाच फलंदाजीला येईल. आणि बहुतेक करून तो सलामीलाच येईल,’ असं नायर यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर शुभमन गिलला संघातून वगळण्याविषयीची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलं. ‘शुभमन सारख्या खेळाडूला वगळता येत नाही. मला त्याच्याबद्दल वाईटच वाटतं. पण, संघाची गरज बघून काही निर्णय आम्ही सर्वांसमक्षच घेतो. संबंधित तीनही खेळाडूंना याबद्दल सुरुवातीपासून माहीत होतं. चेंडू ५० षटकं जुना झाला की, गोलंदाज कमी पडतात. त्यामुळे गोलंदाजीत विविधता आणणं आम्हाला गरजेचं वाटलं. केवळ त्यासाठी वॉशिंग्टनला संघात घेण्यात आलं आहे,’ असं नायर यांनी स्पष्ट केलं. (Boxing Day Test)
मेलबर्नला पहिल्या डावांत जाडेजा आणि वॉशिंग्टन यांच्या फिरकी जोडीने गोलंदाजीत संतुलन आणल्याचं मत अभिषेक नायरने व्यक्त केलं. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतल्यावर पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं होतं. पण, अखेर बुमराहनेच भारताला मोक्याच्या क्षणी बळी मिळवून दिले. त्याने ७५ धावांत ३ बळी घेतले. तर वॉशिंग्टन आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गडी गमावून ३११ धावा केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community