Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल

तनुष कोटियनने यंदा देशांतर्गत हंगाम गाजवला आहे.

64
Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल
Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल
  • ऋजुता लुकतुके

रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या जागी भारतीय संघात मुंबईचा ऑफ स्पिनर तनुष कोटियनची (Tanush Kotian) वर्णी लागली आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) आधीच तनुष मेलबर्नला रवाना होणार आहे. तनुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३३ कसोटींत २५.७० च्या सरासरीने १०३ बळी मिळवले आहेत. या हंगामातली प्रथमश्रेणी क्रिकेटमधला तो सर्वोत्तम भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

शिवाय तनुष (Tanush Kotian) गरज पडल्यास फलंदाजीही करू शकतो. त्याने रणजी स्पर्धेत आतापर्यंत २ शतकं आणि १३ अर्धशतकं नोंदवली आहेत. २४ वर्षीय तनुष भारतीय ए संघाचा सदस्य होता. आणि ऑस्ट्रेलियन ए संघाविरुद्ध मेलबर्नला झालेल्या कसोटीत तो खेळला आहे. त्यामुळे एमसीजीवर खेळण्याचाही त्याला अनुभव आहे. हीच गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली आहे. ताज्या रणजी हंगामात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात तनुषने मोलाची कामगिरी बजावली आहे. हंगामात त्याने ४० च्या सरासरीने ५०२ धावा केल्या. आणि २९ बळीही मिळवले आहेत.

(हेही वाचा – कौशल्य विकासमंत्री Mangal Prabhat Lodha यांनी स्वीकारला पदभार; पहिल्या वर्षी ‘इतके’ लाख रोजगार देणार)

(हेही वाचा – Roads in Mumbai : अधिकारी म्हणतील तिथे नाही, तर जनता सांगेल त्या भागाचीच तपासणी करा; मीरा कामत यांची मागणी)

रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) जागा तनुष कोटियन (Tanush Kotian) घेणार आहे. ब्रिस्बेन कसोटीनंतर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो तातडीने मायदेशी परतला. त्यामुळे भारतीय संघात रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोनच फिरकीपटू राहिले आहेत. मेलबर्न आणि पुढे सिडनीतही चेंडूला कमी उसळी मिळते. त्यामुळे भारतीय संघ दोन फिरकीपटू घेऊन खेळण्याचा विचार करू शकतो.

बोर्डर – गावसकर मालिका (Border – Gavaskar series) सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आणि येत्या २६ डिसेंबरला मेलबर्न इथं तर ४ जानेवारीला सिडनी इथं उर्वरित दोन कसोटी होणार आहेत. या कसोटी जिंकल्या तरंच भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.