Boxing Day Test : विराट, अनुष्का दिसले मेलबर्नच्या रस्त्यावर शॉपिंग करताना

Boxing Day Test : मेलबर्न कसोटीची विराट जोरदार तयारी करत आहे

52
Boxing Day Test : विराट, अनुष्का दिसले मेलबर्नच्या रस्त्यावर शॉपिंग करताना
Boxing Day Test : विराट, अनुष्का दिसले मेलबर्नच्या रस्त्यावर शॉपिंग करताना
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मेलबर्न कसोटीची जोरदार तयारी करत आहे. एमसीजीवर तो दिवसाचे दोन तास नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. आणि सरावात तरी चेंडू त्याच्या बॅटच्या मध्यावर बसताना दिसत होते. सरावानंतरचा वेळ विराट आपल्या कुटुंबीयांबरोबर घालवताना दिसतोय. अलीकडेच मेलबर्न रस्त्यावर पत्नी अनुष्का शर्माबरोबर शॉपिंग करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्याने हा व्हीडिओ काढून ट्विट केला आहे. आणि आता तो सगळीकडे पसरला आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- प्रयागराज येथील महाकुंभमेळा लक्ष्य करण्याची खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannu ची धमकी)

ऑस्ट्रेलियात नाताळच्या दिवशी सकाळी घेतलेला हा व्हीडिओ आहे. या दौऱ्यावर विराट आपली पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका व अकाय यांच्याबरोबर आला आहे. पहिल्या पर्थ कसोटीत विराटने शतक ठोकलं तेव्हा अनुष्का शर्मा मैदानात हजर होती. आणि शतकानंतर विराटने या शतकाचं श्रेयही अनुष्काला दिलं होतं. (Boxing Day Test)

 ‘अनुष्का आता माझ्याबरोबर आहे हे मला खूप बरं वाटतंय. कारण, तिने मधल्या काळात मला अगदी जवळून पाहिलंय. आणि माझ्या आतामध्ये काय सुरू होतं, हे फक्त तिलाच माहीत आहे,’ असं विराट तेव्हा म्हणाला होती. पर्थमधील यशानंतर एरवी या मालिकेत विराट अपयशीच ठरला आहे. शतकाचा अपवाद सोडला तर उर्वरित ४ डावांमध्ये त्याच्या धावा आहेत ४, ११, ७ व ३. मेलबर्नमध्ये आता विराट फलंदाजीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. (Boxing Day Test)

 मेलबर्न कसोटीत मोठा डाव खेळण्याचा विराटचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. बोर्डर – गावसकर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. तरंच भारताला अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठता येईल. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.