Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन मीडियाने टीका केलेल्या विराटला भारतात आणि परदेशातही पाठिंबा, शास्त्रीने ऑस्ट्रेलियन मीडियाला सुनावलं 

178
Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन मीडियाने टीका केलेल्या विराटला भारतात आणि परदेशातही पाठिंबा, शास्त्रीने ऑस्ट्रेलियन मीडियाला सुनावलं 
Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन मीडियाने टीका केलेल्या विराटला भारतात आणि परदेशातही पाठिंबा, शास्त्रीने ऑस्ट्रेलियन मीडियाला सुनावलं 
  • ऋजुता लुकतुके

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि नवोदित सॅम कोन्स्टास यांच्यात झालेली टक्कर ऑस्ट्रेलियात अजून गाजत आहे. खासकरून त्यावर ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू आणि मीडियाने दिलेल्या तिखट प्रतिक्रियांमुळे विराटवरील कारवाईनंतरही याची चर्चा सुरूच आहे. विराटने कोन्स्टासला खांद्याने दिलेला धक्का अनावश्यक होता, असं भारतातही सर्वांना वाटतंय. रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनीही हेच मत व्यक्त केलं आहे. विराटला झालेला दंडही त्याने स्वीकारला आहे. पण, त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियात शुक्रवारी जेव्हा वर्तमानपत्र घरोघरी पोहोचली तेव्हा त्यांनी केलेली टीकाही मात्र जिव्हारी लागणारी होती. (Boxing Day Test)

या खेळाला वाहिलेल्या एका दैनिकाने विराटच्या नाकावर क्रिकेटचा लाल चेंडू दाखवून विराटला चक्क ‘विदूषक’ म्हटलं आहे. तर काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा अपवाद वगळता सगळ्यांनी विराटला २० टक्के दंड करून सोडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. केरन मॅकेफी या माजी खेळाडूने तर मर्यादा पार करताना, ‘विराटची अख्खी कारकीर्द त्याच्या माजावरच उभी आहे,’ असं म्हटलं होतं. अखेर मॅकेफीला टीव्ही कार्यक्रमात जाहीर माफी मागावी लागली. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Mumbai Crime : मित्राने सेक्स रॅकेटमध्ये अडकवले, तन्मयने केली नस कापून आत्महत्या)

या सगळ्या टिकेनंतर विराट शुक्रवारी मैदानावर शांत होता. ३६ धावांची छोटेखानी खेळीही तो खेळला. पण, शेवटच्या पंधरा मिनिटांत उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याची जुनी सवय पुन्हा आड आली आणि तो बाद झाला. आणि ऑस्ट्रेलियात होत असलेली टीका बघितली तर भारतीय मीडिया आणि माजी खेळाडूंनी विराटला पाठिंबाच दिला आहे. (Boxing Day Test)

रवी शास्त्रीने तर ऑस्ट्रेलियन मीडियालाच सुनावलं आहे. ‘मेलबर्न कसोटीआधी भारतावर आणि विराटवर दडपण आणण्यासाठी त्यांनी केलेली ही खेळी होती,’ असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. ‘मालिकेत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळावी यासाठी मीडियाने केलेला हा प्रयत्न आहे. विराटने कोन्स्टासला धक्का दिला, यात मीडियाल संधी दिसली. आणि त्यांनी आगपाखड करायला सुरुवात केली. खरंतर प्रकरण इतकं गंभीर नाही. ऑस्ट्रेलियाने हे चाळे बंद करावेत,’ असं शास्त्रीने आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात म्हटलं आहे. तर सुनील गावसकरांनीही समालोचन करताना, ‘ही चूक आहे. गुन्हा नाही. त्यासाठी कोहलीला फासावर चढवणार का?’ असा सवालच विचारला आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Hindu Population 2050 : २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू पोचणार तिसर्‍या क्रमांकावर)

एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना विराटच्या विरोधात बोलणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची मागची वर्तणूकही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिकी पाँटिगने आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेली गैरवर्तणूक आणि कर्णधार असताना पंचांनी निकाल देण्याची वाट बघण्यापूर्वीच बोट वर करण्याचा केलेला आगाऊपणा, पंचांच्या दिशेनं धावून जाणं यांचे व्हीडिओही व्हायरल होत आहेत. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.