-
ऋजुता लुकतुके
मेलबर्न कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा होता. सॅम केन्सटास (६०), उस्मान ख्वाजा (५७), मार्नस लबुशेन (७२) आणि स्टिव्ह स्मिथ (नाबाद ६८) या पहिल्या चार फलंदाजांनी अर्धशतकी मजल मारली आहे. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३११ अशी मजल पहिल्या दिवशी मारली आहे. पहिल्या दोन सत्रांत मिळून दोनच बळी मिळवल्यानंतर तिसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सूर गवसला. आणि त्याने एकूण ७५ धावांत ३ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. सुंदर, जाडेजा आणि आकाशदीप या तिघांनीही एक – एक बळी घेत हातभार लावला. (Boxing Day Test)
मेलबर्नमध्ये प्रचंड उकाडा जाणवेल असा पहिल्या दिवसाचा अंदाज होता. पण, त्याबरोबरच वाराही होता. त्यामुळे पहिल्या दिवशी उकाड्याचा तितकासा त्रास जाणवला नाही. आणि खेळपट्टीमध्येही फारसे बदल म्हणजे भेगा वाढताना दिसल्या नाहीत. खेळपट्टी आताही फलंदाजांनाच साथ देताना दिसत आहे. दुसऱ्या दिवशी मात्र हवा बरीचशी ढगाळ असेल. तापमान २० अंश सेल्सिअरपर्यंत उतरेल असा अंदाज ॲक्युवेदर वेबसाईटने दिला आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा – वांद्रे आणि वरळी लव्हग्रोव्हमधील सांडपाण्यावर तात्पुरत्या स्वरुपात Bioremediation तंत्रज्ञानाचा वापर)
That’s Stumps on Day 1
Australia reach 311/6 with Jasprit Bumrah leading the way with 3️⃣ wickets
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/8CPfzzk1gH
— BCCI (@BCCI) December 26, 2024
शुक्रवारी पश्चिमेकडून १९ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तर मैदानात येईपर्यंत वाऱ्यांचा वेग ३९ किमी प्रती तासांपर्यंत पोहोचू शकतो. या वाऱ्यांची बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाशदीप (Akash Deep) यांना नक्की मदत होऊ शकते. चेंडूला चांगली दिशा त्यामुळे मिळेल. थोडक्यात, पहिल्या सत्रात गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. (Boxing Day Test)
वातावरणात ५७ टक्के आर्द्रता असेल. त्यामुळे वातावरण आणि खेळपट्टीतील दव टिकून राहू शकेल. आणि गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत नक्की मिळेल. पावसाची शक्यता फक्त २ टक्के आहे. पूर्ण ६ तासांचा खेळ पाहायला मिळेल एवढं नक्की. दुपारनंतरही तापमान २१ अंश सेल्सिअस इतकं असेल. आणि आग्नेय दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर मात्र वाढेल. आणि अशावेळी चेंडूवर नियंत्रण मिळवणं हे गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. तर फलंदाजांनाही चेंडूची दिशा ओळखणं कठीण जाऊ शकतं. आकाश ८५ टक्के अभ्राच्छादित असेल. (Boxing Day Test)
(हेही वाचा – Air Quality Index : मुंबईतील २८ बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन, महापालिकेच्या लेखी सूचना)
भारत वि ऑस्ट्रेलिया, मेलबर्न कसोटीचा दुसरा दिवस (खेळाच्या वेळा, भारतीय वेळेनुसार)
पहिलं सत्र – सकाळी ५ ते ७
भोजन – सकाळी ७ ते ७.४०
दुसरं सत्र – सकाळी ७.४० ते ९.४०
चहापान – सकाळी ९.४० ते १०
अंतिम सत्र – सकाळी १० ते १२
हेही पहा –
Join Our WhatsApp Community