-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी गैरवर्तणुकीसाठी दंड झाला. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी कोहलीच्या सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेतला. दहावं षटक संपल्यावर विराट कोहली चेंडू उचलून खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला जात असताना त्याची ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कोन्स्टासबरोबर टक्कर झाली. विराटने आपल्या खांद्याने कोन्स्टासला धक्का दिला. (Boxing Day Test)
(हेही वाचा- चित्रपट चित्रिकरणाच्या सर्व अनुमतींसाठी एक खिडकी योजना सुरु करा; Ashish Shelar यांचे निर्देश)
क्रिकेट हा स्पर्शाचा खेळ नसल्यामुळे कोणत्या प्रकारचा स्पर्श जर हेतुपुरस्सर केलेला असेल तर तो गुन्हा आहे. त्यामुळे विराटने आयसीसीच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचं स्पष्ट होतं. पण, कोहलीच्या या कृत्यानंतरही खेळाडूंमध्ये संवाद होता. आणि कोन्स्टासला इजा झाली नाही, त्यामुळे विराट फक्त दंडावर सुटला. नाहीतर विराटवर एका सामन्याची बंदीही येऊ शकली असती. (Boxing Day Test)
Virat Kohli and Sam Konstas exchanged a heated moment on the MCG. #AUSvIND pic.twitter.com/QL13nZ9IGI
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
कोहलीवर गैरवर्तणुकीसाठी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही विराटवर गैरवर्तणुकीसाठी दंडाची कारवाई झालेली आहे. असे काही प्रसंग पाहूया, (Boxing Day Test)
(हेही वाचा- २०३६ च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूरचे ‘वाघ’ बघायचे आहेत; आमदार Sudhir Mungantiwar यांची तरुणांकडून अपेक्षा)
२०१९ एकदिवसीय विश्वचषक – २०१९ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात झाला होता. आणि या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटवर अपील करताना आक्रमकता दाखवल्याबद्दल दंड झाला होता. त्याच्या मानधनातून ३० टक्के कापून घेण्यात आले. हा पहिल्या श्रेणीचा गुन्हा धरण्यात आला. साऊदॅम्पटनमध्ये झालेल्या या सामन्यात अती अपील करण्याचा उत्साह कोहलीला नडला होता. एका पायचितच्या अपीलासाठी कोहली मैदानावरील पंच आलम दर यांच्या दिशेनं धावत गेला होता. (Boxing Day Test)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी (२०१८) – इथेही विराट कोहलीचं मैदानातील पंच मायकेल गॉ यांच्याशी भांडण झालं होतं. पावसाच्या विश्रांतीनंतर चेंडू खूप ओला होत आहे. आणि गोलंदाजांना पकड नीट जमत नाहीए असं विराटचं म्हणणं होतं. त्याने पंच गॉ यांच्याकडे ते मांडलं. आणि ते ऐकत नाही म्हटल्यावर तिथेच राग व्यक्त करत त्याने जोराने चेंडू जमिनीवर आपटला होता. कोहलीच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापण्यात आली. (Boxing Day Test)
(हेही वाचा- NEP मध्ये प्रशिक्षण आणि वाचन चळवळीवर विशेष लक्ष केंद्रीत करणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा)
पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक (२०१६) – मिरपूरला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात पंचांनी बाद दिल्यावर निर्णयाबद्दल विराटने नाराजी व्यक्त केली होती. आणि मैदानातच पंच वाद घातला होता. त्यानंतर सामनाधिकारी जेफ क्रो यांनी त्याच्या मानधनातून ३० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय दिला. (Boxing Day Test)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध (२०१४) – ॲ़डलेड कसोटीच्या चौथ्या दिवशी विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात मैदानावर वाद झाला. वरुण एरॉनच्या एका नोबॉलवर डेव्हिड वॉर्नर बाद झाला. तोपर्यंत भारतीय संघाने गडी बाद झाल्याचा आनंद सुरू केला होता. त्यावर वॉर्नरने काहीतरी शेरेबाजी केली. आणि मैदानातच विराट, वॉर्नर आणि शिखर धवन यांच्यात भांडण सुरू झालं. सामनाधिकाऱ्यांनी वॉर्नरच्या मानधनातून १५ टक्के आणि विराट तसंच धवनच्या मानधनातून प्रत्येकी ३० टक्के रक्कम कापण्याचा दंड ठोठावला. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Conversion : पैशांचे आमिष दाखवून ख्रिसमसच्या कार्यक्रमात धर्मांतर; हिंदू संघटनांनी उधळला डाव)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध (२०१२) – सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीने प्रेक्षकांकडे बघून मधलं बोट दाखवलं होतं. मधलं बोट दाखवणं हे पाश्चात्य संस्कृतीत अवमानजनक मानलं जातं. त्यासाठी सामनाधिकारी रंजन मुदगले यांनी कोहलीच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापली होती. (Boxing Day Test)
न्यूझीलंड विरुद्ध (२०१०) – न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पंचांच्या निर्णयाचा अनादर केल्याबद्दल कोहलीच्या सामन्यातील मानधन १५ टक्के कापण्यात आलं. (Boxing Day Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community