Brian Lara on Virat Kohli : सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटला जड जाईल असं ब्रायन लाराला का वाटतं?

विराट कोहली सचिन सारखी १०० आंतरराष्ट्रीय शतकं करु शकणार नाही, असं ब्रायन लाराला वाटतंय आणि त्यासाठी त्याने क्रिकेटमधील तर्क वापरल्याचं म्हटलंय. 

321
Brian Lara on Virat Kohli : सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटला जड जाईल असं ब्रायन लाराला का वाटतं?
Brian Lara on Virat Kohli : सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटला जड जाईल असं ब्रायन लाराला का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली सचिन सारखी १०० आंतरराष्ट्रीय शतकं करु शकणार नाही, असं ब्रायन लाराला वाटतंय आणि त्यासाठी त्याने क्रिकेटमधील तर्क वापरल्याचं म्हटलंय. (Brian Lara on Virat Kohli)

विराट कोहलीने नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत ५० एकदिवसीय शतकांचा विक्रम पूर्ण केला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरसमोर त्याने हे विक्रमी ५०वं शतक झळकावलं. भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात या शतकांच योगदान होतंच. शिवाय विराटने खेळातील अजोड सातत्यही दाखवून दिलं. कारण, ४९ वं शतक आणि ५०वं शतक हा पल्ला गाठायला त्याला फक्त दोन सामने लागले. (Brian Lara on Virat Kohli)

(हेही वाचा – Konkan Mandal Mhada Lottery : म्हाडा कोंकण मंडळाची सोडत ढकलली पुढे)

त्यानंतर विराटने सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थापित एकेक विक्रम मोडण्याचा सपाटाच लावलाय. त्याच्या नावावर आता सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक अर्धशतकं जमा आहेत. ३५व्या वर्षी विराटसमोर आता सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्टं मानलं जातंय ते १०० आंतरराष्ट्रीय शतकांचं. सध्या त्याच्या नावावर आहेत ८० शतकं. (Brian Lara on Virat Kohli)

पण, उरलेली २० शतकं त्याच्यासाठी खूप सोपी नसतील, असं वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने आनंदबझार पत्रिका या भारतीय वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे. (Brian Lara on Virat Kohli)

‘विराट आता किती वयाचा आहे? ३५ बरोबर? मग एका वर्षांत ५ शतकं म्हटलं तरी उरलेल्या २० शतकांसाठी त्याला ४ वर्षं लागतील आणि तोपर्यंत तो ३९ वर्षाचा असेल. हे शक्य आहे का? खूपच कठीण आहे हे,’ असं लारा या मुलाखतीत म्हणतोय. (Brian Lara on Virat Kohli)

(हेही वाचा – AYODHYA : राम मंदिराच्या उदघाटनाच्यादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा; महंत अनिकेत शास्त्री यांची मागणी)

२० शतकं हा खूप दूरचा पल्ला आहे. त्याबद्दल आताच बोलू नये असं लाराला वाटतं आणि तीच भावना बोलून दाखवताना त्याने क्रिकेटमधील तर्क वापरलाय. तो तर्क त्याच्याच भाषेत असा आहे, ‘अनेक कसलेले फलंदाज अख्ख्या कारकीर्दीत २० शतकं जमवू शकत नाहीत. विराटला शंभरवर पोहोचायला आणखी २० हवी आहेत. क्रिकेटचा तर्क वापरला तर ही अशक्यप्राय गोष्ट आहे. उरलेल्या४ ४-५ वर्षांत ही मजल मारणं हे अवघड आहे. त्यामुळे इतक्या लवकर याबद्दल बोलू नये.’ (Brian Lara on Virat Kohli)

अर्थात, विराटने सचिनचा हा विक्रम मोडला तर आनंदच होईल, असं लाराने म्हटलंय. पण, विराट सचिनचे इतर अनेक विक्रम मोडेल. पण, शंभर शतकांचा विक्रम मोडणं सगळ्यात कठीण आणि दुरापास्त असेल असं मतही त्याने व्यक्त केलं आहे. (Brian Lara on Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.