भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात देशातील ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे दिग्गज कुस्तीपटू यांनी पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलन सुरु केले असून ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता तिथे कलम १४४ लावण्यात आला आहे.
(हेही वाचा – Brij Bhushan Singh : यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनावरून ‘फोगाट’ भावंडांमध्ये वाद)
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून आता तिथे कलाम १४४ लावण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: A scuffle breaks out between protesting wrestlers and Delhi Police at Jantar Mantar pic.twitter.com/gzPJiPYuUU
— ANI (@ANI) May 3, 2023
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पोलिस कर्मचारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यामधील गोंधळाचा (Brij Bhushan Singh) एक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत एका पैलवानांने पोलिसांनी आपल्याला धक्काबुकी केल्याचा आरोप केला आहे. कुस्तीपटूच्या कपाळावर मोठी जखम झाली असून त्याला मद्यधुंद असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.
हेही पहा –
या प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, आम आदमी पक्षाने आंदोलनकर्त्यांसाठी काही फोल्डिंग बेड्स आणले होते.मात्र पोलिसांनी त्यावर आक्षेप घेत आंदोलन (Brij Bhushan Singh) करणाऱ्या कुस्तीपटूला धक्काबुक्की केली.
दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आरोप केला आहे की, पोलिसांनी कुस्तीपटू (Brij Bhushan Singh) यांना आई- बहिणींवरून शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. यावर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अशातच वाढलेल्या तणावामुळे दिल्ल्ली पोलिसांकडून कलम १४४ लावण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community